Home /News /mumbai /

'सत्यमेव जयते' म्हणत रोहित पवारांनी लगावला पार्थला टोला, 'आता तोंड न लपवता...'

'सत्यमेव जयते' म्हणत रोहित पवारांनी लगावला पार्थला टोला, 'आता तोंड न लपवता...'

रोहित पवार यांनी ट्वीट करून भाजप नेते आणि सुशांत प्रकरणावरून आरोप करणाऱ्यांना सणसणीत टोला लगावला आहे. विशेष म्हणजे, पार्थ पवार यांनीही....

    मुंबई, 03 ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून पेटलेल्या राजकीय वादावर अखेर माती पडली आहे. सुशांतची हत्या नसून आत्महत्याच असल्याचे एम्स हॉस्पिटलने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी, अशी मागणीच केली आहे. रोहित पवार यांनी ट्वीट करून भाजप नेते आणि सुशांत प्रकरणावरून आरोप करणाऱ्यांना सणसणीत टोला लगावला आहे. विशेष म्हणजे, पार्थ पवार यांनीही या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे रोहित पवार यांनी 'सत्यमेव जयते' म्हणत पार्थ यांनाही चांगलाच टोला लगावला आहे. विवेक राहाडे आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, सुसाइड नोट निघाली बनावट रोहित पवार म्हणाले की, 'बिहार निवडणुकीसाठी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या मृत्यूचं भांडवल करू पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर AIIMS हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमने  दिलेल्या अहवालामुळे पाणी फेरले आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.' असा टोलाच लगावला आहे. तसंच, या प्रकरणात ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली. विशेष म्हणजे, रोहित पवार यांनी #सत्यमेवजयते असा हॅशटॅगही वापरला. नागपूर हादरलं, अवघ्या 2 तासांपूर्वी जन्मलेलं बाळ रस्त्यावर फेकलं! सुशांत प्रकरणात जेव्हा भाजप नेत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तेव्हा खुद्द पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी सुशांत प्रकरणाची सीबीआय तपासाची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे चांगलेच संतापले होते. 'मी माझ्या नातव्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, तो अजून अपरिपक्व आहे', असं म्हणत पवारांनी नातवाचे कान उपटले होते. पण, तरीही पार्थ पवार हे वारंवार आपल्याच पक्षाविरोधात वेगळी भूमिका मांडत होते. सुशांत प्रकरणाचा तपास जेव्हा सुप्रीम कोर्टाने सीबीआयला देण्याचा निर्णय दिला होता. खरंतर एका प्रकारे हा ठाकरे सरकारला धक्का होता. पण, 'सत्यमेव जयते' म्हणत पार्थ यांनी पुन्हा एकदा ट्वीट करून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळेच आता रोहित पवार यांनी सत्यमेव जयते म्हणत एका प्रकारे पार्थ यांना चांगलाच टोला लगावला आहे. काय आहे एम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा रिपोर्ट? सुशांत प्रकरणात  दिल्लीतील​ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) च्या डॉक्टरांच्या टीमने सीबीआयकडे आपला अहवाल सुपूर्द केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  AIIMS च्या डॉक्टरांनी सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली असावी, या थेअरीला नकार दिला आहे. सुशांतची हत्या झाली नाही, असं या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी आणि त्याच्या वकिलांनी सुशांतला आधी विष देऊन मारले आणि नंतर गळफास देण्यात आला असा आरोप केला होता. मुंबई पोलिसांवर आरोप करणारे तोंडावर आपटले, सेनेचा सणसणीत टोला पण AIIMS च्या डॉक्टरांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास केला.  सुशांतच्या गळ्यावर असलेले ligature मार्क आणि शवविच्छेदनात स्पष्ट करण्यात आलेली मृत्यूची वेळ व इतर तथ्यांनुसार, सुशांतची हत्या झाली असावी असं म्हणता येणार नाही, असं डॉक्टरांच्या टीमने स्पष्ट केले आहे.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या