देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. येत्या काही दिवसांत या निवडणुकीसाठी मतदान सुद्धा होणार आहे. त्यामुळे या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने हा अर्थसंकल्प सादर केला असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. वाचा : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त? आणि काय महाग? वाचा सविस्तर... केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांची फसवणूक करणार आहे. एका हाताने द्यायचे दुसऱ्याचं घ्यायचे असा हा अर्थसंकल्प आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल कोल्हे यांनी केली आहे. भाजपकडून अर्थसंकल्पाचं कौतुक राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं, सर्वव्यापी, सर्व स्पर्शी सर्व घटकांना काही तरी देण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये केला आहे. उद्योगांना चालना देणारे बजेट, टॅक्सेशनमध्ये सुधारणा आहे. पायाभूत सुविधांवर भर, रस्ते, रेल्वे, हवाई मार्गावर भर.. आर्थिकदृष्या बॅकंना बळकटी आणण्याचा प्रयत्न, कॅार्पोरेट टॅक्स कमी केला आहे. आर्थिक विकास आणि बळकटीकरणावर भर देण्यात आला आहे. याचा देशाच्या आर्थिक प्रगतीवर भर दिला आहे. वाचा : Budget 2022 : शिक्षण क्षेत्रासाठी मोठी घोषणा, डिजीटल युनिव्हर्सिटीसह 200 चॅनल सुरु करणार डिजीटल रूपयाची घोषणा झाल्याने या भागात गुंतवणूक करू इच्छूक खूष आहेत. त्यामुळे गुंतवणूक वाढेल. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे देशाची आर्थिक परिस्थिती वाईट झाली आहे. त्यांना नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत असताना शासनाने आपल्या इन्कम टॅक्समध्ये वाढ केली नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प!#Budget2022
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 1, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Budget, NCP, Union budget