'सामना'चा वापर वडापावचं तेल जिरवण्यासाठी, बॅनरमधून राष्ट्रवादीचा सेनेवर हल्लाबोल

'सामना'चा वापर वडापावचं तेल जिरवण्यासाठी, बॅनरमधून राष्ट्रवादीचा सेनेवर हल्लाबोल

अजित पवारांना दुतोंडी साप म्हणत सामनाच्या अग्रलेखातून अजित पवारांवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्याचा निषेध म्हणून काल रात्री सामनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने बॅनरबाजी केलीये.

  • Share this:

मुंबई, 07 एप्रिल : अजित पवारांना दुतोंडी साप म्हणत सामनाच्या अग्रलेखातून अजित पवारांवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्याचा निषेध म्हणून काल रात्री सामनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने बॅनरबाजी केलीये. मुंबईमध्ये सामना हा वडापावचं तेल जिरवण्यासाठी वापरला जातो असं या बॅनरवर लिहिण्यात आलंय.

हल्लाबोल यात्रेत अजित पवारांनी शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेला दुतोंडी गांडुळ म्हटलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून सामनामधून अजित पवारांना दुतोंडी साप म्हणणं हा सापाचा अपमान ठरेल. त्याचबरोबर अजित पवारांची तुलना शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या छिंदमशी करण्यात आली होती. त्यावरून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.

First published: April 7, 2018, 10:26 AM IST

ताज्या बातम्या