कळवा स्टेशनवर राष्ट्रवादी काँग्रेसचा रेलरोको पोलिसांनी 3 मिनिटात संपवला

कळवा स्टेशनवर राष्ट्रवादी काँग्रेसचा रेलरोको पोलिसांनी 3 मिनिटात संपवला

सीएसटीकडे जाणारी लोकल कळव्याला थांबा आहे म्हणून थांबली आणि त्या लोकलसमोरच पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत रास्ता रोको केलं. पण पोलिसांनी त्यांना तात्काळ रुळांवरुन बाजूला हटवलं. कळवा इथे लोकल रोखल्या गेल्यास लोकल वाहतुकीचा मोठा खोळंबा होईल हे ठाणे पोलिसांनी आधीच ओळखलं होतं .

  • Share this:

कळवा, 03 ऑक्टोबर: एलफिन्स्टन इथल्या अपघाताचा निषेध करण्यासाठी कळवा इथलं राष्ट्रवादी काँग्रेसचं रेल रोको आंदोलनाची घोषणा केली होती. अवघ्या ३ मिनिटात संपवण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे.

आज पोलिसांनी केलेली पूर्वतयारी चांगलीच कामाला आली आहे. सीएसटीकडे जाणारी लोकल कळव्याला थांबा आहे म्हणून थांबली आणि त्या लोकलसमोरच पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत रास्ता रोको केलं. पण पोलिसांनी त्यांना तात्काळ रुळांवरुन बाजूला हटवलं. कळवा इथे लोकल रोखल्या गेल्यास लोकल वाहतुकीचा मोठा खोळंबा होईल हे ठाणे पोलिसांनी आधीच ओळखलं होतं आणि त्यानुसारच त्यांनी आपली व्यूहरचना आखली होती.

या पक्षाचे बहुतांश कार्यकर्ते खारेगाव, विटावा आणि पारसिक बोगदा या परिसरातील असल्यानं पोलिसांनी कालच कोंबिग ऑपरेशन करुन अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. तसंच स्टेशच्या परिसरातही पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्यानं कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात स्टेशन परिसरात पोचू शकले नाहीत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड रेल रोको करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत २५ ते ३० कार्यकर्तेच होते. आंदोलनकर्ते अवघ्या २ ते ३ मिनिटांत रेल्वे ट्रॅकवरुन बाजूला झाले.

 

एकंदरीतच काय तर झाल्या प्रकारामुळे आंदोलनकर्ते आंदोलन झालं म्हणून खूश झाले, आंदोलन थोडक्यात आटोपलं म्हणून पोलीस आनंदी झाले आणि लोकलचा खोळंबा नाही म्हणून प्रवाश्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला.मुंबईत शुक्रवारी झालेल्या चेंगराचेंगरीचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन राष्ट्रवादीने घोषित केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2017 08:56 AM IST

ताज्या बातम्या