News18 Lokmat

'दुसऱ्यांची लेकरं किती दिवस गोंजारणार?' मुंबईत राष्ट्रवादीची भाजपविरोधात पोस्टरबाजी

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा झालेल्या भाजपप्रवेशावरून राष्ट्रवादीने ही टीका केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 21, 2019 10:25 AM IST

'दुसऱ्यांची लेकरं किती दिवस गोंजारणार?' मुंबईत राष्ट्रवादीची भाजपविरोधात पोस्टरबाजी

मुंबई, 21 मार्च : 'ज्यांना आम्ही नाकारलं त्यांना का गोंजारता? दुसऱ्यांची लेकरं किती दिवस गोंजारणार?' असं म्हणत मुंबईत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने भाजपविरोधात जोरदार पोस्टरबाजी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा झालेल्या भाजपप्रवेशावरून राष्ट्रवादीने ही टीका केली आहे.

'ज्यांना आम्ही नाकारले आणि हाकलले, त्यांनाच तुम्ही स्वीकारले, गोंजारले. आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं घेणार?' असा खोचक सवाल करत राष्ट्रवादीने भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यातच काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटली यांचे सुपुत्र सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर बुधवारी राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा रणजितसिंह यांनीही भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला.

रणजित यांचा भाजप प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. रणजितसिंह यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला माढ्यात मोठा धक्का बसला आहे.

Loading...

सुजय विखेंच्याही हाती कमळ

काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सुजय विखे पाटील यांची नगरमधून लोकसभा उमेदवारीसाठी केंद्रीय समितीकडे शिफारस करणार आहोत, अशी घोषणाही केली आहे.


SPECIAL REPORT : माढ्यानंतर शरद पवारांचा 'प्लॅन B'!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2019 10:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...