मुंबई, 12 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि आपले आजोबा शरद पवार यांनी चांगलेच झापून काढले. त्यानंतर आता पार्थ पवारांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केले आहे.
'मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नाही', असं सांगून शरद पवारांनी आपल्या पार्थ नातवाला जाहीरपणे फटकारले. शरद पवार यांच्या विधानावर पार्थ पवारांनी सावध प्रतिक्रिया दिली.
"पवार साहेब बोलले त्यावर आता मला कोणतेही भाष्य करायचे नाही"असं म्हणत पार्थ यांनी आजोबांच्या वक्तव्यावर बोलण्याचं टाळलं आहे.
तसंच, 'सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि शरद पवार यांच्या वक्तव्यावर विनाकारण मला नवीन कोणतेही वक्तव्य करायचे नाही' असंही पार्थ म्हणाले.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घेणार? थथी थरुर यांच्या वक्तव्यानंतर चर्चा सुरू
दरम्यान त्याआधी, 'माझ्या नातवाच्या मागणीला मी कवडीची किंमत देत नाही, तो अपरिक्वव आहे' अशा शब्दात शरद पवार यांनी पार्थ पवार यांची कानउघडणी केली. तसंच 'सुशांत प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्याची कोणतीही गरज नाही. मुंबई पोलिसांना मी गेल्या 50 वर्षांपासून ओळखतो. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
'सुशांतसिंग प्रकरणाची चर्चा करण्याचे कारण नाही. त्यामुळं कुणी काय आरोप केले यात मी खोलात जाणार नाही. माझ्या दृष्टीनं हा विषय तितका महत्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली तर नक्कीच दु:ख होते. परंतु, त्याची चर्चा ज्या पद्धतीने होत आहे. त्याचे मला आश्चर्य वाटते.' असंही पवार म्हणाले.
राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली नियुक्ती का?
काही दिवसांपूर्वी पार्थ पवार (Parth Pawar) यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची भेट घेतली होती. यावेळी पार्थ पवार यांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
शरद पवार याआधीही झाले होते पार्थवर नाराज
लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच आजोबा आणि नातवाच्या वादाला तोंड फुटले आहे. मावळमधून पार्थच्या उमेवारीलाही पहिला रेड सिग्नल हा आजोबा पवारांनीच दाखवला होता.
'सुशांतची मृत्यूनंतरची प्रसिद्धी PM पेक्षाही जास्त' NCPनेत्याच्या वक्तव्याने वाद
'घरच्यांनीच निवडणुका लढवायच्या तर कार्यकर्त्यांचं काय? असा सवाल उपस्थित करत शरद पवारांनी त्यावेळी विरोध दर्शवला होता.
पण पवारांनी जाहीर विरोध करुनही पुढे सरतेशेवटी पार्थला मावळमधून उमेदवारी द्यावीच लागली. त्यासाठी मग पवारांना माढ्यातून माघार घ्यावी लागली होती. पण, निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतरही मावळामधून पार्थ पवार पराभूत झाले.