राम कदमांनाच सगळीकडे पिवळं दिसतंय, राष्ट्रवादीच्या नेत्याचा सणसणीत टोला

राम कदमांनाच सगळीकडे पिवळं दिसतंय, राष्ट्रवादीच्या नेत्याचा सणसणीत टोला

'कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतं, तशीच काहीशी अवस्था राम कदम यांची झालेली दिसते'

  • Share this:

सागर कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 13 डिसेंबर : सत्तेवरून पायउत्तार झाल्यानंतर भाजपचे नेते महाविकासआघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. ट्वीटरवर सुद्धा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी आगामी अधिवेशनावरून सरकारवर टीका केली. त्यांच्या या टीकेला उत्तर देत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी जोरदार टोला लगावला आहे.

सरकारच्या कामाची अजब पद्धत आहे. हिवाळी अधिवेशनात आमदाराना प्रश्न विचारण्यावर प्रतिबंध घालण्यात आला असून प्रश्नोत्तराचा तास होणार नाही, अशी टीका राम कदम यांनी केली.

त्यांच्या या टीकेला नवाब मलिक यांनी ट्वीटकरून प्रत्युत्तर दिले आहे. 'कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतं, तशीच काहीशी अवस्था राम कदम यांची झालेली दिसते, अशी जोरदार टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

तसंच आमदार राम कदम यांनी चुकीची वक्तव्ये करण्याआधी विधानसभेतील कामकाजाचे नियम समजून घ्यावेत, असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित करायचे प्रश्न (LAQ) ३० दिवस आधी देणे अपेक्षित असते. सदनात लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित करता येऊ शकतात याची माहितीही नवाब मलिक यांनी करुन दिली.

कामकाज सल्लागार समितीच्या (BAC) अजेंड्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिली आहे. याची आठवणही नवाब मलिक यांनी राम कदम यांना करुन दिली.

Published by: sachin Salve
First published: December 13, 2019, 10:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading