मुंबई, 24 मार्च : 'राज्य सरकार अस्थिर करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी राष्ट्रपती राजवट लागणार नाही. महाविकास आघाडीकडे (MVA Government) बहुमत आहे, तुमच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता होणार नाही', असं म्हणत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि अल्पयंख्याक मंत्री नवाब मलिक (Navab malik) यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devenra fadanvis)यांच्यावर टीका केली.
भारतीय जनता पक्षाचे नेते आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटले त्यानंतर नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
'राज्यपालांना भेटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे असे भाजप सांगत आहे परंतु, महाविकास आघाडी सरकार अस्थिर नाही तर खंबीर आहे. अस्थिर करण्याच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता कधीच होणार नाही, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.
सोनं चोरीची घटना पाहून माधुरी दीक्षितला हसू आवरेना, शेअर केला VIDEO
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पैसे खाण्यात आले आहे. हे रश्मी शुक्ला यांच्या रिपोर्टच्या आधारावर फडणवीस आरोप करत आहे. एक पान फक्त प्रेसला द्यायचे आणि पूर्ण रिपोर्ट द्यायचा नाही. त्या रिपोर्टमध्ये नावे आहेत .त्यानुसार बदल्या झाल्या नाहीत. फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिले आहेत. बदलीची प्रक्रिया काय आहे. त्याच्यात बोर्ड आहे.ते शिफारसी करते. कनिष्ठ अधिकार्यांच्या बदल्यांचा बोर्ड हा डीजीच्या अखत्यारीत असतो. म्हणजे सुबोध जयस्वाल हे पैसे घेऊन नावांची शिफारस करत होते का? असा गंभीर सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.
आमिर खानला कोरोनाची लागण, मुख्यमंत्र्याबरोबर लावली होती कार्यक्रमात हजेरी
'त्या रिपोर्टच्या आधारावर सरकारला बदनाम करण्याचे काम फडणवीस करत होते. कालच फडणवीस यांचे असत्य काय आणि सत्य काय हे जनतेसमोर ठेवले आहे. भाजपाला सत्तेशिवाय राहता येत नाही म्हणून ते हे सगळे उपद्रव करत आहेत,' असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.