Home /News /mumbai /

मुंबईतल्या चौपाटीवर कोरोना योद्ध्यांसोबत सुप्रिया सुळेंचा खास सेल्फी, व्यक्त केल्या या भावना!

मुंबईतल्या चौपाटीवर कोरोना योद्ध्यांसोबत सुप्रिया सुळेंचा खास सेल्फी, व्यक्त केल्या या भावना!

तुम्ही आमची काळजी घेत असल्यानेच आम्ही सुरक्षीत आहोत अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

  मुंबई 03 ऑक्टोबर: कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरांप्रमाणेच पोलीस सुद्धा मोठी लढाई लढत आहेत. त्यात अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यात 100 पेक्षा जास्त पोलिसांचे बळीही गेले आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या कोरोनायोद्धांबद्दल खास कृतज्ञता व्यक्त केलीय. संध्याकाळी मुंबईतल्या चौपाटीकडे जात असताना सुप्रिया सुळे यांनी गाडी थांबवून तिथे तैनात असलेल्या पोलिसांची भेट घेतली. ज्या कठिण परिस्थितीत पोलीस काम करत आहेत त्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीत असं सुळे यांनी म्हटलं आहे. त्यांनी तिथल्या सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबत एक सेल्फी काढून आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.  तुम्ही आमची काळजी घेत असल्यानेच  आम्ही सुरक्षीत आहोत अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. राज्यात शनिवारी पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसभरात 16 हजार 835 जणांनी कोरोनावर मात केली त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातल्या बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 11 लाख 34 हजार 555 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 79.3 टक्के आहे. दिवसभरात 14 हजार 348 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 278 जणांचा मृत्यू झाला. राज्यातला मृत्यूदर 2.64 एवढा झाला आहे. दरम्यान,  राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत पर्यटन संचालनालयामार्फत आज आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली. मिशन बिगीन अगेनअंतर्गत येत्या 5 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमते एवढच हॉटेल्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर– सिंह यांनी आदरातिथ्य क्षेत्रातील विविध रेस्टॉरंटस् आणि हॉटेल संघटनांना पत्राद्वारे एसओपीची माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने एसओपीमध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सगळ्यांनी तंतोतत पालन करावे असं आवाहन सरकारने केले आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Police, Supriya sule

  पुढील बातम्या