मुंबई, 28 नोव्हेंबर : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या नावाने सुरू असलेल्या एका ट्वीटर अकाऊंट मागच्या काही दिवसांपासून प्रमाणात सक्रिय होतं. महाविकास आघाडीला वर्षपूर्वी झाल्यानिमित्तानं या ट्वीटर अकाऊंटवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारचं अभिनंदन करत भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं.
सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे देखील राजकारणात सक्रिय होणार का? असे अनेक सवाल देखील उपस्थित होऊ लागले असतानाच हे अकाऊंट रेवती सुळे यांचं नसल्याचं म्हटलं जात आहे. रेवती सुळे यांच्या नावाने फेक अकाऊंट तयार करून त्यावरून हे सगळे प्रकार होत असल्याचं म्हटलं जात आहे. तर या प्रकरणानंतर ट्वीटरकडून हे ट्वीट हटवण्यात आलं आहे.
I congratulate CM Shri @OfficeofUT Ji , Dep. CM Shri @AjitPawarSpeaks ji & Revenue Min Shri @bb_thorat ji for a year of MVA government & for steering the state towards progress despite pandemic & opposition’s politics.
महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्तानं केलेल्या त्या ट्वीटनंतर तक्रार करण्यात आली असून ते अकाऊंट ट्वीटरकडून सस्पेंड केल्याचं सांगण्यात आलं आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे यापूर्वी या आकाऊंटवरून पवार आणि सुळे कुटुंबीयांमधले अनेक क्षण आणि फोटो ट्वीट करण्यात आले होते. मात्र महाविकास आघाडीच्या वर्षपूर्वीनिमित्तानं भाजपवर त्या अकाऊंटवरून जे ट्वीट करण्यात आलं त्यानंतर हा सगळ्या प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ट्वीटरनं ते अकाऊंट सन्पेन्ड केल्याची माहिती मिळाली आहे.