देवेंद्र फडणवीसांवर राष्ट्रवादीच्या नेत्याचा तिखट हल्ला

देवेंद्र फडणवीसांवर राष्ट्रवादीच्या नेत्याचा तिखट हल्ला

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलं आहे.

  • Share this:

शिवाजी गोरे, रत्नागिरी, 28 डिसेंबर : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे अनेक नेते महाविकास आघाडीवर आघाडीवर टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते आणि रायगड मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार पलटवार केला आहे. 'सत्ता गेल्यामुळे काही लोकांच्या मनावर परिणाम झाला आहे, त्यामुळेच त्यांची चिडचिड सुरू आहे,' असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आधीच्या सरकारच्या काही निर्णयांना दिलेले स्थगिती, शेतकरी कर्जमाफी अशा काही मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे.

'राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे सरकार मजबूत विचारांवर आधारित आहे. महाविकास आघाडी सरकार राज्याचा सर्वांगीण विकास करेल,' असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

'भाजप सत्तेचं दिवा स्वप्न पाहात आहे'

महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकणार नाही, असं म्हणणाऱ्या भाजप नेत्यांना सुनील तटकरे यांनी फटकारलं आहे. 'भाजप सत्तेचे दिवा स्वप्न पाहात आहे. सरकार जास्त दिवस टिकणार नाही असं भाजपचे नेते बोलत आहेत. परंतु असे काही नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार चांगले काम करेल असेही तटकरे म्हणाले. खासदार सुनील तटकरे रायगड लोकसभा मतदारसंघातील दापोली दौऱ्यावर आले असता त्यांनी भाजपावर ही टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2019 05:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading