• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही Corona; अमोल कोल्हेंनी रुग्णालयातून हात जोडून केलं महत्त्वाचं आवाहन

लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही Corona; अमोल कोल्हेंनी रुग्णालयातून हात जोडून केलं महत्त्वाचं आवाहन

MP Amol Kolhe: कोरोना बाधित झाल्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.

 • Share this:
  मुंबई, 21 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह (Amol Kolhe tests positive for Covid19) आली आहे. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर अमोल कोल्हे हे उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. अमोल कोल्हे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे (Covid vaccine) दोन्ही डोस घेतले होते मात्र, तरिही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यानंतर अमोल कोल्हे यांनी रुग्णालयातून सर्व नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. ...म्हणून शासकीय रुग्णालयाचा पर्याय निवडला खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबूकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून अमोल कोल्हेंनी म्हटलं, महाराष्ट्र शासनाची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम असून यावार माझा विश्वास आहे. म्हणूनच कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर शासकीय रुग्णालयाचा मी पर्याय निवडला आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो आहे. आपण आपल्या व्यवस्थांवर विश्वास दाखविला पाहिजे. संभाजीराजेंचं आंदोलन भाजप प्रणित, अशोक चव्हाणांचं टीकास्त्र हा डेल्टा व्हेरिएंट? अमोल कोल्हेंनी पुढे म्हटलं, दोनवेळा कोरोना प्रतिबंधक लस घेऊन सुद्धा माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाहीये याची प्रचिती मला आलेली आहे. हा डेल्टा व्हेरिएंट असू शकतो. कारण तो लस घेतल्यानंतरची प्रतिकारशक्ती सुद्धा भेदू शकतो. नियम, निर्बंध काटेकोरपणे पाळा त्यामुळे लस घेतली म्हणजे धोका टळला असे समजून गाफिल राहू नका. सर्वांनी कोरोनाचे नियम, निर्बंध काटेकोरपणे पाळा. विविध माध्यमातून माझे हितचिंतक काळजी व्यक्त करतायत, शुभेच्छा देत आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो.
  Published by:Sunil Desale
  First published: