धनंजय मुंडेंवर आरोप, अमोल कोल्हे विरोधकांना म्हणाले...

धनंजय मुंडेंवर आरोप, अमोल कोल्हे विरोधकांना म्हणाले...

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर झालेल्या आरोपांवरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर झालेल्या आरोपांवरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर झलेले आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. कोणी काय बोलावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कोणाच्या वैयक्तिक विषयात मी बोलणं योग्य नाही म्हणत त्यांनी विषयाला बगल दिली.पुण्याच्या नामांतरावर कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मात्र राज्यात कोरोनाचं सावट आहे, शिवजयंती ही कोरोनाची परिस्थिती विचाराच घेऊनच साजरी व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या दोन्ही मंत्र्यांवर झालेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. 'आम्ही कोणीही याप्रकरणात हस्तक्षेप करणार नाही. धनंजय मुंडे यांनी याबाबत खुलासा केला आहे. भाजप वेगवेगळ्या मागण्या करत आहेत, हे भाजपचंकाम आहे, पण मंत्रिमंडळात फेरबदलाची आवश्यकता नाही, वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील,' असं जयंत पाटील म्हणाले.

तर 'नवाब मलिक यांच्या जावयाला झालेल्या अटकेबाबत फार माहिती नाही, पण सरकार यात हस्तक्षेप करणार नाही. दोन्ही विषय पोलिसांकडे आहेत, त्यांनी निपक्ष चौकशी करावी. जावयाने काय केलं, त्याचं खापर सासऱ्यावर का फोडता?' असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे वाद?

धनंजय मुंडे यांनी आपले विवाहबाह्य संबध असून यातून आपल्याला दोन मुलं झाली आहेत, याची कबुली दिली, तसंच त्यांच्यावर बलात्काराचा आरोपही करण्यात आला आहे. तर नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीने अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणामध्ये नवाव मलिक यांचा जावई समीर खान याचं नाव समोर आलं आहे.

Published by: Shreyas
First published: January 14, 2021, 12:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading