नवी मुंबई, 05 जानेवारी : राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या कामाचा धडाका संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ज्या प्रकारे भल्या पहाटे अजितदादा मेट्रोची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते, त्याच स्टाईलने त्यांचा पुतण्या आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एमपीएमसी मार्केट गाठले. पहाटे 4 वाजता रोहित पवार हे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये पोहोचले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज पहाटे 4 वाजता एपीएमसीमधील भाजी व फळ मार्केटचा दौरा केला.
यावेळी आमदार रोहित पवार एपीएमसीमधील व्यापारी तसंच काही शेतकऱ्यांशी चर्चा करत एपीएमसी मधील यंत्रणा समजून घेण्याचा प्रयत्न केला. रोहित यांनी ठिकठिकाणी थांबून व्यापारी आणि शेतकऱ्यांची विचारपूस केली.
शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना एपीएमसीमध्ये येणाऱ्या अडचणी येत्या अधिवेशनात मांडणार आहे. यावेळी रोहित पवार यांनी शिवसेनेचे वर्षा राऊत यांनी ईडीकडून सुरू असणाऱ्या चौकशीवर आणि औरंगाबादच्या नामांतरावर ही भाष्य केलंय. रोहित पवार यांच्या अचानक नवी मुंबईच्या भेटीमुळे महापालिका निवडणुकांमध्ये रोहित पवार सक्रिय होणार असल्याचे ही संकेत दिले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.