• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • पार्थ पवारांनी पुन्हा सरकारला डिवचलं, रोहित पवार म्हणाले...

पार्थ पवारांनी पुन्हा सरकारला डिवचलं, रोहित पवार म्हणाले...

पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीशी विसंगत भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 ऑगस्ट : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार (Parth Pawar) यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतली आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्याबाबत सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. हा राज्य सरकारला धक्का समजला जात असतानाच पार्थ पवार यांनी मात्र 'सत्यमेव जयते' असं म्हणत कोर्टाच्या निर्णयानंतर समाधान व्यक्त केलं आहे. पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीशी विसंगत भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'सुशांतला न्याय मिळायलाच हवा. पण आम्ही मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. पार्थने काय ट्वीट केलं माहीत नाही. पण ट्वीटचा प्रत्येकाला हवा तसा अर्थ काढता येतो, ते प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून असतं,' असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. पार्थ पवार यांनी पुन्हा डिवचलं? राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार (Parth Pawar) यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारण याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर समाधान व्यक्त केलं आहे. 'सत्यमेव जयते', असं सूचक ट्वीट पार्थ पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सार्वजनीरित्या फटकारल्यानंतरही पार्थ पवार याप्रकरणी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहेत. दरम्यान, याच प्रकरणात पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तो अपरिपक्व आहे, असं म्हणत पार्थ पवार यांना जाहीरपणे खडेबोले सुनावले होते. शरद पवारांच्या या आक्रमक भूमिकेनंतरही पार्थ पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने राष्ट्रवादीतील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
  Published by:Akshay Shitole
  First published: