‘राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार अज्ञानी, त्यांनी माहिती घेऊन बोलावे’ भाजप नेत्याचा निशाणा

‘राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार अज्ञानी, त्यांनी माहिती घेऊन बोलावे’ भाजप नेत्याचा निशाणा

'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये फोन वरून चर्चा झालीय. पंतप्रधानांनी मदतीचं आश्वासनही दिलं आहे.'

  • Share this:

मुंबई 20 ऑक्टोबर:  शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्राने मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली होती. त्यावरून भाजपचे माजी मंत्री आणि प्रदेश अध्यक्ष किसान मोर्चाचे अध्यक्ष अनिल बोंडे यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. रोहीत पवार हे अज्ञानी आहेत, त्यांनी माहिती घेऊन बोलावे असं बोंडे म्हणाले. अनिल बोंडे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये फोन वरून चर्चा झालीय. पंतप्रधानांनी मदतीचं आश्वासनही दिलं आहे.

जीएसटीचे पैसेही केंद्र सरकार देत आहे. राज्य सरकारने आपली जबाबदारी टाळून केंद्राकडे बोट दाखवू नये. फडणवीस सरकार असताना या आधी उद्धव ठाकरे यांनी जी मागणी शेतकऱ्यांसाठी केली होती तीच मागणी त्यांनी पूर्ण करावी असंही ते म्हणाले.

गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जो शब्द दिलीय तो त्यांनी पुर्ण करावा ती वेळ आलीय असंही त्यांनी सांगितलं.

काय म्हणाले रोहित पवार?

दुःख वाटून घेण्याची आपली संस्कृती आहे. आज बळीराजावर दुःखाचा डोंगर आहे. तो दूर करायचा असेल तर प्रत्येकाला जबाबदारी घ्यावीच लागेल. राज्य सरकार ती घेत आहे. पण केंद्रानेही GST चे राज्याचे थकीत 28 हजार कोटी अन्नदात्याला आणि असंघटित क्षेत्राला सावरण्यासाठी तातडीने द्यावेत अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती.

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकाच्या जनजागृतीसाठी भाजपच्या किसान मोर्चाचे महासचिव खासदार राजकुमार चाहर हे आज मुंबईत आले होते. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कृषी विधेयकांचं समर्थन करत राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

ते म्हणाले, स्वामिनाथन आयोगाची एकही शिफारस केंद्राने लागू केली नाही. आम्ही 98 टक्के स्वामीनाथन आयोगातील गोष्टी लागू केल्या आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेल आहे त्यांना अजून राज्य सरकारने मदत केलेली नाही. राज्य सरकारने सत्ता स्थापन करण्याआधी जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करावं.

‘काय थिल्लरपणा केला मुख्यमंत्र्यांनी? फडणवीसांची भाषा चूक’; जयंत पाटलांचा पलटवार

पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांसोबत कायम आहेत. राज्याला वेळोवेळी आम्ही केंद्रातून मदत दिली आहे. 24 तासात राज्य सरकारने मदत करायला पाहिजे होती असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 20, 2020, 3:47 PM IST

ताज्या बातम्या