'हेच राज्यातील भाजप नेत्यांनाही सांगा', रोहित पवारांनी केलं मोदींचं कौतुक

'गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे'

'गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे'

  • Share this:
    मुंबई, 22 नोव्हेंबर :  राज्यात कोरोनाच्या (Corona) परिस्थितीत आंदोलनं करणाऱ्या भाजप (BJP) नेत्यांना टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm narendra Modi) यांचं कौतुक केलं आहे. 'राज्यातील भाजप नेत्यांना आता तुम्हीच कोरोना संकटाची जाणीव करून द्या', अशी मागणीच रोहित पवारांनी केली. रोहित पवार यांनी यांनी ट्वीट करून राज्यातील भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.  जी 20 समिट परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशांना आवाहन केले आहे. 'गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारचं कौतुक करायलाच हवं. देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही असंच काम होईल, असा विश्वास आहे' असं म्हणत रोहित पवार यांनी मोदींचं कौतुक केले आहे. तसंच, 'कोरोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगापुढचं सर्वात मोठं आव्हान असून याविरोधात निर्णायक कृती करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी G20 Summit परिषदेत जागतिक नेत्यांना केल्याने आनंद वाटला. त्यांनी या संकटाची जाणीव भाजपच्या राज्यातील नेत्यांनाही करुन दिली तर ते या संकटाचा राजकीय खेळ थांबवतील' अशी कोपरखळीही राज्यातील भाजप नेत्यांना लगावली आहे. सोलापुरात महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ दरम्यान, सोलापूर शहरात पदवीधर आणि शिक्षक आमदारकीच्या निवडणूक (Graduate and Teacher Constituency Elections) प्रचार सभेचं आयोजन करण्यात आले होते. या प्रचार सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थितीत होते. तसंच, उदय सामंत, बंटी पाटील, दत्तात्रय भरणे इत्यादी नेतेही हजर होते. महाविकास आघाडीची सभा असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे या सभेला राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पण, अचानक या सभेत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. व्यासपीठावरील पोस्टरवर  कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो पोस्टवर नव्हता. तसंच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचा हा मतदारसंघ असून त्यांचाही फोटो नव्हता, त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच संतापले होते. त्यांनी व्यासपीठाकडे धाव घेऊन जोरात घोषणाबाजी केली. अखेर, कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जाहीर माफी मागण्यात आली. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध मावळला. अर्धा तासाच्या गोंधळानंतर कार्यक्रमाला पुन्हा एकदा रितसर सुरुवात झाली.
    Published by:sachin Salve
    First published: