Home /News /mumbai /

जितेंद्र आव्हाड पुन्हा 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंना दिलं 'निमंत्रण'

जितेंद्र आव्हाड पुन्हा 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंना दिलं 'निमंत्रण'

मागील महिन्यात १२ आॅक्टोबर रोजी जितेंद्र आव्हाड यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

    उदय जाधव, प्रतिनिधी मुंबई, 04 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जितेंद्र आव्हाड यांनी 'मातोश्री'वर जाऊन ही भेट घेतली. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या 'उग्रलेख' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले आहेत. या पुस्तकाचे निमंत्रण देण्यासाठी आव्हाड आज मातोश्रीवर पोहोचले होते. आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाली. काल शनिवारी उग्रलेख हा माझ्या पुस्तक प्रकाशनाची आंमत्रण पत्रिका आई , बाबांचा चरणी ठेवली त्यांनतर शरद पवार यांना दिली आणि आज औपचारिकरित्या उध्दव ठाकरे यांना दिली अशी माहिती आव्हाड यांनी टि्वट करून दिली. विशेष म्हणजे, उग्रलेख पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी शरद पवार यांना पहिले आमंत्रण दिले त्यानंतर उद्धव ठाकरे आणि सुशील कुमार शिंदे यांना दिले आहे. मागील महिन्यात १२ आॅक्टोबर रोजी जितेंद्र आव्हाड यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपासाठी वाटाघाटी सुरू असताना आज राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर पोहोचल्यामुळे राजकीय गोटात एकच खळबळ उडाली होती. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांची ही भेट सदिच्छा असल्याचं आव्हाड यांनी टि्वट करून सांगितलं होतं. ======================
    First published:

    Tags: Jitendra awhad, NCP, Shivsena, Uddhav Thackery, उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी, शिवसेना

    पुढील बातम्या