राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंना म्हणाले 'Thanks'

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंना म्हणाले 'Thanks'

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर पोहोचल्यामुळे राजकीय गोटात एकच खळबळ उडालीये.

  • Share this:

मुंबई, 12 आॅक्टोबर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागले असून राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीये. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज 'मातोश्री'वर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतलीये.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपासाठी वाटाघाटी सुरू असताना आज राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर पोहोचल्यामुळे राजकीय गोटात एकच खळबळ उडालीये. जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. ही सदिच्छा भेट असल्याचं आव्हाड यांनी टि्वट करून सांगितलंय.

जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा फोटो टि्वटवर शेअर केलाय. फोटो शेअर करत असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या टि्वटर अकाऊंटला टॅग करून थँक्स म्हटलंय. त्यामुळे आव्हाडांच्या थँक्सचा नेमका अर्थ काय ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झालाय. विशेष म्हणजे, आज संध्याकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपाबद्दल चर्चा होणार आहे. त्या चर्चेच्या आधी आव्हाड यांनी 'मातोश्री'वर जाऊन भेट घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव तर टाकत असल्याची चर्चा रंगलीये.

दरम्यान, जून महिन्यात जितेंद्र आव्हाड मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही भेटले होते. या भेटीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा खास निरोप घेऊन आव्हाड गेल्याचे म्हटले जात होते.

===============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2018 01:23 PM IST

ताज्या बातम्या