'शंभर कुत्रे एका वाघाची शिकार करु शकत नाहीत', आव्हाडांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

'शंभर कुत्रे एका वाघाची शिकार करु शकत नाहीत', आव्हाडांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

'जंगलातील शंभर कुत्रे एका वाघाची शिकार करु शकत नाहीत, ते फक्त भुंकू शकतात', अशा खालच्या पातळीवरची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 31 मार्च: लोकसभा निवडणुकांचा प्रचार जसा रंगतदार होत चालला आहे तस तसा प्रचाराची पातळी देखील खालावात चालली आहे. 'जंगलातील शंभर कुत्रे एका वाघाची शिकार करु शकत नाहीत, ते फक्त भुंकू शकतात', अशा खालच्या पातळीवरची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे. पाटील यांनी कालच 'शरद पवार हे चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करतात,' असा गंभीर आरोप केला होता. त्याला उत्तर देताना आव्हाड यांनी अशा प्रकारचे शब्द वापरले आहेत.

आव्हाड यांनी रविवारी ट्विटरवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यात एक व्हिडिओ देखील आहे. ज्यात त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्ला चढवला. कधी एकही निवडणूक न जिंकलेले नाहीत. लॉटरी लागली म्हणून तुम्ही जिंकून आलात. गेल्या 2-3 दिवसात तुम्ही ज्या पद्धतीने शरद पवारांवर टीका करत आहात. पण तुमच्या लक्षात आले आहे की पवार साहेबांवर टीका केली की हेडलाईन मिळते. तळागाळात माहित नसलेल्या चंद्रकांत दादांना लोक ओळखू लागतात. कारण काय तर ते शरद पवारांवर टीका करतात. अशाच प्रकारची टीका गोपीनाथ मुंडे यांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी 1990-95 या काळात केले होते, असे आव्हाडांनी व्हिडिओत म्हटले आहे.

त्याच बरोबर आव्हाड हे देखील म्हणाले की, 'जंगलातील शंभर कुत्रे एका वाघाची शिकार करु शकत नाहीत, ते फक्त भुंकू शकता. गेल्या 40 वर्षात महाराष्ट्रातील राजकारणात शरद पवार हे केंद्रबिंदू आहेत. अनेक जण आले त्यांच्यावर टीका केली आणि वृत्तपत्रात हेडलाईन घेतली. पण त्यातील काही काळाने संपवले काही स्वत:हून संपले'.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील

''शरद पवार हे चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करतात,'' असा गंभीर आरोप भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. इतकंच नाही तर ''याच चार जागा निवडणुकीत पडल्या तर पवारांना दिल्लीत रहायला घर शोधावं लागेल'', असा टोलाही त्यांनी लगावला होता. सांगोल्यात माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजीत निंबाळकरांच्या प्रचार सभेत चंद्रकांत पाटील बोलत होते. ''शरद पवारांचा जीव बारामती, माढा, कोल्हापूर आणि सातारा या चार मतदारसंघात आहे. पण यंदा हे चारही मतदारसंघ भाजप जिंकेल,'' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

First published: March 31, 2019, 2:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading