राष्ट्रवादीच्या या आमदाराचे राहुल गांधींना आवाहन, म्हणाले अजूनही वेळ गेली नाही!

राष्ट्रवादीच्या या आमदाराचे राहुल गांधींना आवाहन, म्हणाले अजूनही वेळ गेली नाही!

काँग्रेसला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे. तुम्ही नेतृत्त्व करा, सोडून जाऊ नका. अजूनही वेळ गेली नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आवाहन केले आहे.

  • Share this:

मुंबई, 18 ऑगस्ट- काँग्रेसला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे. तुम्ही नेतृत्त्व करा, सोडून जाऊ नका. अजूनही वेळ गेली नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आवाहन केले आहे. गेली 75 दिवस मी अस्वस्थ होतो. आपण दिलेल्या राजीनाम्यावर पुनर्विचार करावा, अशी अस्वस्थताही आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड..

सोनिया गांधी वयोमान आणि प्रकृतीच्या कुरबुरी असूनही काँग्रेसचा सुवर्णकाळ परत आणू शकतील, यात तीळमात्र शंका नाही. मात्र, आपण एक संवेदनशील नेते आहात. सध्या उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीला तुम्ही नेटाने तोंड देऊ शकता. हा क्रौर्य तसंच विकासाचा मुखवटा पांघरलेली प्रवृत्ती आणि लोकांची खरी काळजी यामधील लढा आहे. त्यामुळे तुम्हाला कठीण काळात नेतृत्त्वाची परीक्षा पास करावीच लागेल. तुमच्या राजीनाम्यामुळे, आणि त्यावर पुनर्विचार करण्यास नकार दिल्यामुळे काँग्रेसवर ओढवलेलं संकट पाहून माझ्यासह अनेकांना त्रास होत होता.

माझ्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात सुमारे 35 वर्षांपूर्वी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून झाली. आज मी महाराष्ट्रातील विधानसभेचा सदस्य आहे. आधीच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये मी राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली. या प्रवासात अनेक चढ-उतार येऊनही लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांवरील माझा विश्वास अढळ राहिला, ती कॉंग्रेसची सुवर्ण भेट मानतो, असे आव्हाडांनी म्हटले आहे.

म्हणूनच तुम्हाला पत्र लिहितोय...

कॉंग्रेस हा एक विचार असल्याचे आपण कायम सांगतात. या विचारधारेने आपल्या बहुसांस्कृतिक देशाला एक राष्ट्र म्हणून जोडले आहे. या विचारसरणीचा मीही पाईक आहे. म्हणूनच तुम्हाला हे पत्र लिहितोय, असं तुम्ही गृहित धरु शकता. मी तुमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नेता असलो तरी विचारसरणी समान आहे, असेही आव्हाड म्हणाले.

जयंत पाटलांचे समर्थन..

जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकवरून राहुल गांधी यांनीच काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळावी, अशा स्वरूपाचं आवाहन केल आहे . यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांचं समर्थन केले आहे. आव्हाड हे सेक्युलर विचारांचे आहेत. एनसीपी आघाडी मित्र पक्षातले अनेक सहकारी त्यांचे जवळचे आहेत. सेक्युलर विचारांमुळेच कदाचित आव्हाड यांनी अशा स्वरूपाची भूमिका मांडल्याचे पाटील म्हणाले.

SPECIAL REPORT: माणसाच्या संगतीत बोकड गेला वाया, पाल्याऐवजी खर्रा खाण्याचं व्यसन!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2019 04:14 PM IST

ताज्या बातम्या