राष्ट्रवादीच्या या नेत्याने आरे जंगल परिसरात केले 'सर्जिकल स्ट्राइक' आंदोलन

मुंबईतील सध्या आरे कॉलनीत कलम 144 अर्थात जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे आरे परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2019 10:22 PM IST

राष्ट्रवादीच्या या नेत्याने आरे जंगल परिसरात केले 'सर्जिकल स्ट्राइक' आंदोलन

मुंबई, 5 ऑक्टोबर: मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीमधील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्यानंतर महापालिकेने पोलिसांच्या मदतीने रातोरात सुमारे 700 झाडांवर कुऱ्हाड चालवली. या वृक्षतोडविरोधात पर्यावरण प्रेमी, राजकीय पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्जिकल स्ट्राइक पद्धतीने आरेच्या जंगलात शिरकाव केला आणि सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. नंतर पोलिसांनी आमदार आव्हाड यांना ताब्यात घेतले.

मुंबईतील सध्या आरे कॉलनीत कलम 144 अर्थात जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे आरे परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे. एकीकडे पर्यवारण प्रेमींना रोखण्यासाठी मोठ्या संख्येने फौजफाटा आरेच्या चहुबाजूनी लावण्यात आला आहे.

पावणे तीन तास जंगलात पायी चालला हा नेता..

आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तब्बल नऊ किलोमीटरचा प्रवास 2 तास 45 मिनिटे पायी चालत आरेमध्ये दाखल झाले. वृक्षतोडीविरोधात त्यांनी आंदोलन केले. सरकारने विकासाच्या नावाखाली मुंबई विकल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आरे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आरेच्या परिसरात आतापर्यंत 1500 पेक्षा जास्त झाडांची कत्तल करण्यात आली आहेत. आतपर्यंत आरे प्रकरणात 29 जणांना अटक केली आहे.

Loading...

आदित्य ठाकरे म्हणाले, रात्री कारवाई करायला 'आरे' हे 'POK'नव्हे

मुंबई महापालिकेने पोलिसांच्या मदतीने रातोरात सुमारे 700 झाडांची कत्तल केल्याचा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निषेध केला आहे. आदित्य यांनी 'ट्विट' करत सरकारच्या वृक्षसंवर्धन मोहिमेवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. रात्री कारवाई करायला 'आरे' हे 'POK'नव्हे, अशा शब्दात आदित्य यांनी टीका केली आहे.

आरेमधील जैवविविधता संपवणे ही लज्जास्पद बाब आहे. मेट्रोचे अधिकारी ज्याप्रकारे आरेतील झाडांची कत्तल करत आहेत ते अत्यंत संतापजनक आहे. या अधिकाऱ्यांची पाक व्यपपीओकेमध्ये नेमणूक करायला हवी आणि झाडांऐवजी दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करण्याचे काम त्यांना द्यावे, असेही आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

शिवसेना सुप्रीम कोर्टात धाव घेणार..

आरेमधील वृक्षतोडीनंतर पर्यावरण प्रेमी, राजकीय पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेनेने या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रीच्या अंधारात अशाप्रकारे वृक्षाची कत्तल करणे नियमबाह्य आहे. या कारवाईच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटले आहे.

VIDEO: आरेतील झाडांवर रात्री कुऱ्हाड; 700 झाडं परत द्या! आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2019 10:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...