हा आमदार देखील पवार साहेबांसोबतच.. म्हणाले, 'मी अडकलोय, मला घ्यायला या'

हा आमदार देखील पवार साहेबांसोबतच.. म्हणाले, 'मी अडकलोय, मला घ्यायला या'

अजितदादा पवार हे गटनेते असल्याने त्यांच्या सांगण्यावरून मी इतर आमदारांसोबत राजभवनात गेलो होतो.

  • Share this:

मुंबई,24 नोव्हेंबर: अमळनेरचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील हे देखील शरद पवार यांच्यासोबत असून त्यांनी त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधल्याची माहिती मिळाली आहे. 'मी श्रीनिवास पवार यांच्या घरी अडकलोय, मला घ्यायला या', अशी फेसबुक पोस्ट देखील आमदार अनिल भाईदास पाटील यानी केली आहे. आमदार पाटील याचे चिरंजिव मुंबईत पोहोचले आहेत. आमदार अनिल पाटील हे अगोदर भाजपमध्ये होते. पण त्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

अफवांवर विश्वास ठेऊ नका..

'मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच आहे, माझ्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्त्वावर विश्वास आहे. अजितदादा पवार हे गटनेते असल्याने त्यांच्या सांगण्यावरून मी इतर आमदारांसोबत राजभवनात गेलो होतो. तिथे काय होणार आहे. याबाबत कोणतीही कल्पना नव्हती, मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही! कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये!' असे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, आमदार अनिल भाईदास पाटील हे शनिवारी सकाळी राज्यभवनात अजित पवार यांच्यासोबत होते. त्यांनी सांगितल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच आमदारांचा सत्तेत जाणाच्या निर्णय होता. महाआघाडीतील तीन पक्षांची बैठक झाल्यानंतर देखील काँग्रेसच्या मागण्या वाढतच होत्या. रात्री उशीरापर्यंत सत्तास्थापनेचा निर्णय झालाच नाही. त्यामुळे सर्व आमदार याला कंटाळले होते. महाआघाडीचा सत्तास्थापनेचा निर्णय झाला नसता तर शिवसेना भाजपसोबत जाण्याची शक्‍यता होती. त्यामुळे रात्री उशीरा अजित पवारांशी चर्चा करून आमदारांनी हा निर्णय घेतला. सकाळी 7 वाजता 15 आमदार राज्यपालासमोर उपस्थित होते. आणखी आमदारही येत असल्याचे ते म्हणाले मी सुद्धा अजित पवार यांच्यासोबत आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यासोबत आहे. आज आम्ही सर्व आमदार सोबत असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता.

Published by: Sandip Parolekar
First published: November 24, 2019, 9:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading