VIDEO राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांच्या भावाची मुजोरी, कामगाराला केली मारहाण

VIDEO राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांच्या भावाची मुजोरी, कामगाराला केली मारहाण

ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांना धमकी देखील दिली. जा पोलीस ठाण्यात जा आणि माझ्या विरोधात तक्रार कर,यापुढे इथे दिसलात तर हात पाय तोडून टाकू असंही ते म्हणाले.

  • Share this:

मुंबई 14 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांनी काही कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. कुर्ल्याजवळच्या चुनाभट्टी भागात रस्त्याचं काम सुरू होतं. तिथे 4 कामगारांना कप्तान मलिकांनी मारहाण केली. यापुढे इथे दिसलात तर हाय-पाय कापून ठेवीन, अशी धमकीही त्यांनी दिली.कप्तान मलिक यांनी रस्त्यावर सुरू असलेल्या कामावरून मारहाण केल्याने खळबळ उडालीय. रस्त्यावर एका ढिकाणी खोदकाम केलं होते आणि त्याठिकाणी फायबर केबलचं कामही सुरू होतं, या ठीकाणी मलिक आले आणि त्यांनी कामगारांकडून वर्क ऑर्डरची मागणी केली.

मात्र त्यांच्याकडे वर्क ऑर्डर नसल्याचा आरोप करत मलिक यांनी त्यांना मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांना धमकी देखील दिली. जा पोलीस ठाण्यात जा आणि माझ्या विरोधात तक्रार कर,यापुढे इथे दिसलात तर हात पाय तोडून टाकू असंही ते म्हणाले. हा व्हिडीओ 1 महिन्या पूर्वीचा आहे अशी प्रतिक्रिया कप्तान मलिक यांनी दिलीय.

शिक्षकाची बदली, डोळ्यांना धारा, VIDEO पाहून तुम्हीही हेलावून जाल

या प्रकारावर कप्तान मलिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. कामाची कुठलीही परवानगी नसताना त्यांनी काम सुरू केलं होतं. त्यांच्याकडे मी परवानगी मागितली मात्र त्यांनी दिली नाही. त्यामुळे मला हात उगारावा लागला असं मलिक म्हणाले.

Published by: Ajay Kautikwar
First published: January 14, 2020, 3:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading