शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली का? नवाब मलिक यांनी केला खुलासा

शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली का? नवाब मलिक यांनी केला खुलासा

'तुमच्या पुर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाकारला होता. याचं उत्तर जनतेला द्या.'

  • Share this:

मुंबई 22 फेब्रुवारी : मी छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलतोय मात्र तुम्ही नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करत आहात. तुमच्या पुर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाकारला होता. याचं उत्तर जनतेला अपेक्षित आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

भाजपवाने नवाब मलिक यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यावरून मलिक यांनी शिवाजी महाराज कीय जय अशी घोषणा दिली नाही असं म्हटलं होतं. त्यावर मलिक यांनी भाजपवर पलटवार केलाय.

दोन वर्षापुर्वी शिवस्वराज्य यात्रेदरम्यान रायगडावर पक्षाचे सर्व नेते एकत्र आले होते. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली होती. त्यावेळी सर्वच नेते जय म्हणाले मी सुद्धा जय म्हणालो. फक्त हात वरती केला नाही याचा भाजप वेगळा प्रचार करत आहेत असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.

मलिक पुढे म्हणाले, त्यावेळीही मी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली आणि आजही देत आहे. शासनाच्या शिवभोजन थाळीच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून सुरुवात केली होती याची आठवणही नवाब मलिक करुन दिली.

हेही वाचा...

गुजरातमध्ये जे झालं त्याची आठवण ठेवा, वारिस पठाणला भाजप नेत्याचा इशारा

‘प्रहार’नेत्याच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, उद्या अकोट बंद

CAAवरून काँग्रेसने साधला CM उद्धव ठाकरेंवर निशाणा

First published: February 22, 2020, 3:04 PM IST

ताज्या बातम्या