Home /News /mumbai /

जयंत पाटलांनी फडणवीसांना बजावले, दिली कोल्हापूरच्या महापुराची आठवण

जयंत पाटलांनी फडणवीसांना बजावले, दिली कोल्हापूरच्या महापुराची आठवण

'फडणवीस यांच्याकडे आता कोणताच मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्र्याविषयी अशी विधान करत आहे.'

    मुंबई, 20 ऑक्टोबर : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यावरून  महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आता भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला जशास तसे उत्तर दिले आहे. 'महाविकास आघाडी सरकार सक्षमपणे काम करत आहे. त्यामुळे नाकर्तेपणाचा प्रश्नच येत नाही. राज्यात जिथे संकट आले तिथे सरकारने मदत पुरवली आहे. शरद पवार हे फडणवीस सरकार असताना ही ते धावून जात होते, त्यांनी अनेक भागांची पाहणी केली होती', असं प्रत्युत्तर पाटील यांनी दिले. पंतप्रधान मोदी आज 6 वाजता देशाला संबोधित करणार, काय बोलणार याकडे लक्ष्य देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थिल्लरपणा करू नये, अशी विखारी टीका केली होती. यावर जयंत पाटील म्हणाले की, 'फडणवीस यांच्याकडे आता कोणताच मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्र्याविषयी अशी विधान करत आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल असे शब्द वापरणे चूक आहे.  मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक वेळी संकटाचा सामना करताना समजूतदारपणा दाखवला आहे', असं म्हणत पाटील यांनी फडणवीसांना यांना बजावले आहे. 'कोल्हापूर- सांगली पूर आला तेव्हा सरकारच उशिरा आलं होतं. त्यावेळी  लोकांनी स्वतःच्या ताकदीवर एकमेकांना मदत केल.  नंतर शेवटच्या दोन तीन दिवसांत सरकारकडून लोकांना मदत मिळाली होती, अशी आठवणही पाटील यांनी फडणवीसांना करून दिली. 'जेव्हा फडणवीस सरकार होते. तेव्हा शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले होते, त्याचे पंचनामे केल्याशिवाय कुणाला मदत केली नाही. अगदी घर पडल्यावर देखील. जे नुकसान झालं त्याची पाहणी केली पाहिजे  म्हणून पंचनामे करत आहोत. पंचनामे न करता कधीही मदत दिली नाही, अशी मदत दिली असा कोणाचा दावा असेल तर तो खोटा आहे.  पडताळणी करून नेहमी तातडीची मदत देण्यात आली आहे, असं ही पाटील यांनी सांगितले. चेन्नई की राजस्थान? औरंगाबादेत बुकी बाप-लेकाला अटक, धक्कादायक माहितीसमोर 'देवेंद्र फडणवीस हे  चौकशीला घाबरत आहे. जलयुक्त शिवार योजनेबद्दल तक्रारी आलेला होत्या. त्यामुले चौकशी केली जात आहे. त्यात राजकीय द्वेष असा काहीही नाही. जलयुक्त शिवार यात गडबड नसेल तर फडणवीस आणि भाजपा घाबरण्याचे काम नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला. 'केंद्राकडून अपेक्षा करण्याचे दोन मुद्दे आहे.  नैसर्गिक आपत्ती आली की केंद्राने मदत करणे अभिप्रेत आहे आणि देशातील सर्व राज्यात आर्थिक स्थिती खराब आहे. 28 हजार कोटी जीएसटी देणं आहे. केंद्राकडून अपेक्षा सगळे राज्य करतात. केंद्राने आमचे पैसे दिले नाही म्हणून अपेक्षा करत आहोत, असंही पाटील यांनी स्पष्ट केले. राज्यात जितका महसूल जमा होतो तो सगळा पगारावर जातो म्हणून आमचा आग्रह आहे की, आमच्या हक्काचे पैसे केंद्राने लवकर द्यावे, अशी मागणीही पाटील यांनी केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या