Home /News /mumbai /

‘काय थिल्लरपणा केला मुख्यमंत्र्यांनी? फडणवीसांची भाषा चूक’; जयंत पाटलांचा पलटवार

‘काय थिल्लरपणा केला मुख्यमंत्र्यांनी? फडणवीसांची भाषा चूक’; जयंत पाटलांचा पलटवार

'फडवणीस हे चौकशीला का भितात तेच कळत नाही. जलयुक्त शिवारबाबत तक्रारी आलेल्या होत्या त्यावरून चौकशी केली जात आहे. त्यात राजकीय द्वेष नाही.'

मुंबई 20 ऑक्टोबर:  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेली थिल्लरपणाची टीका महाविकास आघाडीला चांगलीच झोंबली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी पलटवार करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. फडणवीस यांना कोणताही मुद्दा राहिला नाही म्हणून मुख्यमंत्र्याविषयी त्यांनी असं विधान केलं आहे. असे शब्द वापरणे चूक आहे. काय थिल्लरपणा केला मुख्यमंत्र्यांनी? असा सवालही त्यांनी फडणवीसांना केला. जयंत पाटील म्हणाले, प्रत्येक वेळी संकटाचा सामना करताना मुख्यमंत्र्यांनी समजूतदारपणा दाखवला आहे.  नैसर्गिक आपत्तीतमध्ये केंद्राने मदत करणे अभिप्रेत आहे. आणि देशातील सर्व राज्यात आर्थिक स्थिती खराब आहे. 28 हजार कोटी जीएसटी देणं आहे. केंद्राकडून अपेक्षा सगळे राज्य करतात. केंद्राने आमचे पैसे दिले नाही म्हणून अपेक्षा करतो. जितका महसूल जमा होतो तो सगळा पगारावर खर्च होतो. म्हणून आमचा आग्रह आमच्या हक्काचे पैसे केंद्राने लवकर द्यावेत. भाजप सरकार असताना पंचनामे केल्याशिवाय कुणाला मदत केली नाही अगदी घर पडल्यावर देखील. जे नुकसान झालं त्याची पाहणी केली पाहिजे, म्हणून पंचनामे करत आहोत.  पंचनामे न करता कधीही मदत दिली नाही.  अशी मदत दिली असा कोणाचा दावा असेल तर तो खोटा आहे. पडताळणी करून नेहमी तातडीची मदत देण्यात आली. कोल्हापूर सांगली पूर आला तेव्हा सरकारच उशिरा आलं. लोकांनी स्वतःच्या ताकदीवर एकमेकांना मदत केली.  नंतर शेवटच्या दोन तीन दिवसात लोकांना मदत मिळाली होती. ‘अशी भाषा चालणार नाही’, ‘आयटम’ वक्तव्यावरून राहुल गांधींनी कमलनाथ यांना फटकारलं सरकार सक्षम पणे काम करत नाकर्तेपणाचा प्रश्न नाही.राज्यात जिथे संकट आले तिथे सरकारने काम केलं आहे. पवार साहेब फडणवीस सरकार असतानाही धावून जात होते. ते नेहमीच जातात. जेवढी वाहतूक वाढेल त्यानंतर 10-15 दिवसात कोरोना रुग्ण संख्या वाढेल. राज्य सरकारने टप्प्या टप्प्याने प्रश्न सोडवले. महिलांसाठी सुविधा निर्माण करावी ही राज्य सरकारची भूमिका आहे. रेल्वेने विनाकारण वेळ लावू नये ,त्यांनी लवकर ट्रेन प्रवास करू द्यावा. 'तिथेच ठोकले पाहिजे', पुण्यातील गुंडांच्या प्रतापामुळे पोलीस आयुक्त संतापले फडवणीस हे चौकशीला का भितात तेच कळत नाही. जलयुक्त शिवारबाबत तक्रारी आलेल्या होत्या त्यावरून चौकशी केली जात आहे. त्यात राजकीय द्वेष नाही. जलयुक्त शिवारमध्ये गडबड नसेल तर फडणवीस आणि भाजपाला घाबरण्याचे काम नाही असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Devendra Fadnavis, Jayant patil

पुढील बातम्या