खाल्ल्या मिठाला जागत होते म्हणून अधिकाऱ्यांच्या बदल्या, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

 खाल्ल्या मिठाला जागत होते म्हणून अधिकाऱ्यांच्या बदल्या, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

'फडणवीस सरकारच्या कार्यकाळात हे अधिकारी खाल्लेल्या मिठाला जागत होते.'

  • Share this:

मुंबई 03 सप्टेंबर: राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी तसेच भारतीय पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका सुरू केली आहे. त्याला उत्तर देतांना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. काही अधिकारी हे आधीच्या सरकारच्या काळात खाल्लेल्या मिठाला जागत असल्याने बदल्या केल्याचं म्हटलं आहे.

राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी नवीन खातं करावं अशी खरपूस टीका काही दिवसांआधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी देखील राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठे आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप केला होता.

या आरोपांना उत्तर देतांना हसन मुश्रीफ यांनी थेट अधिकाऱ्यांच्या निष्ठेवरच प्रश्न चिन्ह निर्माण केलं आहे. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात हे अधिकारी खाल्लेल्या मिठाला जागत असल्याने बदल्या केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुश्रीफ यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी 15 टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला असल्याची गंभीर टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. इतकंच नाही तर या प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करावी, अशी मागणीदेखी चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

सुसाट...! 10वीच्या विद्यार्थ्याने भंगारातून बनवली बाईक, 80 किमीचा आहे Average

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त खात्याने बदल्या करू नयेत असा आदेश दिला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांवरील स्थगिती उठवली, हे आश्चर्यकारक आहे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्य सरकारने कोरोनामुळे बदल्या रोखल्या होत्या पण नंतर पंधरा टक्के बदल्यांना परवानगी देऊन त्यावरील स्थगिती उठवली. परिणामी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी मलाईदार ठिकाणी बदली करून देण्याचा बाजार मांडला. यामध्ये फार मोठ्या रकमेची उलाढाल झाली.

विषारी सापाला तो डीजेच्या तालावर नाचवत होता, आणि एका क्षणात सगळंच गेलं बदलून

तसेच ज्यांचे राजकीय लागेबांधे नाहीत आणि ज्यांच्याकडे आर्थिक बळ नाही अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला. या सर्व प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करण्याची गरज आहे असंही त्यांनी म्हटलं होतं.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 3, 2020, 8:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading