मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

...व्यवस्था मान्य करावी लागेल, भुजबळांचा राज्यपालांवर निशाणा

...व्यवस्था मान्य करावी लागेल, भुजबळांचा राज्यपालांवर निशाणा

'महाविकास आघाडी सरकार पाडता येणार नाही. पण तरीही सरकारला अडचणीत आणायचे आणि बदनाम करायचे असे प्रकार सुरू आहे',

'महाविकास आघाडी सरकार पाडता येणार नाही. पण तरीही सरकारला अडचणीत आणायचे आणि बदनाम करायचे असे प्रकार सुरू आहे',

'महाविकास आघाडी सरकार पाडता येणार नाही. पण तरीही सरकारला अडचणीत आणायचे आणि बदनाम करायचे असे प्रकार सुरू आहे',

मुंबई, 27 ऑक्टोबर : राज्यपाल नियुक्त सदस्य (Legislative Council MLA) निवडीवरून राज्यपाल आणि ठाकरे सरकारमध्ये वाद सुरू आहे. 'राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या  जागेसाठी  मंत्रिमंडळाचे काम हे प्रस्ताव पाठवणे आहे. राज्यपालांचे काम आहे की, त्यांनी मंत्रिमंडळ प्रस्ताव आला तर त्याला मंजुरी द्यायची, ही एक व्यवस्था आहे' असं म्हणत राष्ट्रवादीचे  नेते आणि अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी (chhagan bhujbal) राज्यपालांवर (governor bhagat singh koshyari)निशाणा साधला आहे. न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना छगन भुजबळ यांनी भाजप आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांची जागा खाली आहे. पण, या जागेबद्दल अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. या जागेसाठी  मंत्रिमंडळाचे काम हे प्रस्ताव पाठवणे आहे. राज्यपालांचे काम आहे की, त्यांनी मंत्रिमंडळ प्रस्ताव आला तर त्याला मंजुरी द्यायची, जी व्यवस्था आहे ती सगळ्यांना मान्य करावी लागेल' असं भुजबळ म्हणाले. अजित पवार कोरोनामुक्त होऊन लवकर घरी यावेत म्हणून बा विठ्ठलाला साकडं... तसंच, 'महाविकास आघाडी सरकार पाडता येणार नाही.  पण तरीही सरकारला अडचणीत आणायचे आणि बदनाम करायचे असे प्रकार सुरू आहे', असा आरोपही भुजबळ यांनी केला. 'मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने जे वकील नियुक्त केले आहे,  हे वकील तेच आहेत जे मागच्या सरकारने नेमले आहेत. ते म्हणतात तसंच काम सुरू आहे.  पण आज सुप्रीम कोर्टात वकील का आले नाही, याबद्दल कल्पना नाही. वकिलांच्या पाठीशी सरकार आहे. मराठा आरक्षणासाठी आम्ही आग्रही आहोत', असंही भुजबळ यांनी स्पष्ट केले. पाकविरुद्ध हॅटट्रिक घेणाऱ्या इरफान पठाणच्या ‘या आहेत 5 सर्वोत्तम खेळी 'कांदा उत्पादक शेतकरी सगळ्यात गरीब आहे. कांद्याची कधी किंमती घसरते, कधीतर अजिबात भाव मिळत नाही. ते अनेक अडचणीतून गेले आहेत. भाव वाढायला लागल्यावर कांद्याची निर्यात बंद केली. जेवढे कांदा व्यापारी  आहे, त्यांच्यावर इन्कम टॅक्स धाडी टाकल्या. कांदा हा सुट्ट्या स्वरूपात येतो, त्यानंतर व्यापारी खरेदी करून मग विक्रीला जातो. साठे केले म्हणून धाड टाकली. त्यामुळे व्यापऱ्यांनी बंद पुकारला आहे.  मी काल विनंती केली आहे की, खरेदी सुरू करावी, जिल्हाधिकार्यनशी बोललो. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहिले आहे', अशी माहितीही भुजबळांनी दिली. 'कांद्याला हमीभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तेव्हा केंद्र सरकार कुठे मदतीला येत नाही. बाहेरून कांदा मागवत आहे, हे त्यावरुन केंद्र सरकार नेमकं कुणासाठी काम करत आहेत?' असा सवालही भुजबळांनी उपस्थितीत केला.
First published:

Tags: राज्यपाल

पुढील बातम्या