मोदींना टक्कर देण्यासाठी 'पॉवर'प्लॅन, मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीला सुरूवात

मोदींना टक्कर देण्यासाठी 'पॉवर'प्लॅन, मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीला सुरूवात

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वा ही बैठक सुरू आहे. आघाडीत आपल्याला मिळालेल्या कोणत्या जागा मित्रपक्षांना सोडाव्यात, तसंच कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार प्रभावी ठरेल, यावर राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 4 जानेवारी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती ठरवण्यासाठी शरद पवार यांच्या अध्यक्षेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. आघाडीत आपल्या वाट्याला आलेल्या 24 जागांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक होत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वा ही बैठक सुरू आहे. आघाडीत आपल्याला मिळालेल्या कोणत्या जागा मित्रपक्षांना सोडाव्यात, तसंच कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार प्रभावी ठरेल, यावर राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

आघाडीचा फॉर्म्युला ठरला

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी 50-50 च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकसभेच्या प्रत्येकी 24 जागा लढवणार हे आता नक्की झालं आहे. तसंच त्यातील दोन्ही पक्ष आता आपल्या वाट्यातून मित्रपक्षांना काही जागा देणार आहेत. राज्यात भाजपविरोधात महाआघाडी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. बऱ्याच बैठकानंतर दोन्ही पक्षांचं आता जागावाटपावर एकमत झालं आहे.

आघाडीतील मित्रपक्षांची मागणी

समाजवादी पार्टी मुंबईत एक जागा मागते आहे. त्यामुळे नेमकी कोणती जागा द्यायची यावरू काँग्रेसची गोची झाली आहे. विद्यमान प्रिया दत्त यांची जूनी जागा तर उत्तर मध्य मुंबई लोकसभा जागा समाजवादी पार्टी मागत आहे. तर दुसरीकडे राजू शेट्टी यांना हातकणंगलेसोबत बुलढाणा लोकसभा मतदार संघ हवा आहे, पण त्यास राष्ट्रवादी अनुकूल नाही.

पालघर लोकसभा मतदार संघाची जागा बहुजन विकास आघाडी, भिवंडी इथल्या जागेसाठी मुस्लिम उमेदवार द्यावा याचा विचार करत काँग्रेस स्वत: अथवा समाजवादी पार्टीला देण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात आहे. प्रकाश आंबेडकर सोबत येत असतील तर अकोला लोकसभा त्यांना देण्याबाबत मित्रपक्षात चर्चा केली जाईल.

VIDEO : अमित शहांनी भाजप खासदारांसोबत शेयर केला युतीबाबतचा 'सीक्रेट प्लान'

First published: January 4, 2019, 10:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading