मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राष्ट्रवादीची बैठक संपली, सर्व नेत्यांवर सोपवली नवी जबाबदारी!

राष्ट्रवादीची बैठक संपली, सर्व नेत्यांवर सोपवली नवी जबाबदारी!

  आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन लखीमपूर घटनेचा निषेध व्यक्त केला होता.

आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन लखीमपूर घटनेचा निषेध व्यक्त केला होता.

शरद पवार (sharad pawar) यांच्या उपस्थितीत बऱ्याच दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. जवळपास 3 तासांहून अधिक काळ ही बैठक चालली होती.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 31 ऑगस्ट : एकीकडे ईडीच्या (ed) नोटीसा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका (Local body elections) या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे (ncp) अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री आणि नेत्यांची बैठक (ncp meeting) पार पडली. या बैठकीत सर्व मंत्र्यांचा कामकाजाचा आढावा घेण्यात आला असून नवी जबाबदारीही सोपवली आहे.

शरद पवार यांच्या उपस्थितीत बऱ्याच दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली.  जवळपास 3 तासांहून अधिक काळ ही बैठक चालली होती. या बैठकीनंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली.

'आजच्या बैठकी मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला आहे. संपर्क मंत्री यांच्या जबाबदारी वाढवण्यात आल्या आहे.  त्या जिल्ह्यातील परिस्थिती कशी यावर चर्चा करण्यात आली आहे. तसंच, स्थानिक स्वराज्य संस्था फेब्रुवारीमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक नेत्याला एक जिल्हा देण्यात आला आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.

सावधान! तुम्ही औषध म्हणून घेत असलेलं टॉनिक विष तर नाही ना? पोलिसांची मोठी कारवाई

तसंच, सरकार स्थापन झाल्यानंतर सुद्धा अद्याम महामंडळाचा मुद्दा मार्गी लागला नाही. त्यामुळे महामंडळ नेमणूक बाबत नाव घेण्यात आली आहे. पुढील 15 दिवसांत नाव जाहीर करणार असल्याचही मलिक यांनी सांगितलं.

या बैठकीत ईडीबाबत चर्चा झाली नाही. पण याबाबत भाजपकडून ठरवून कट सुरू आहेत. यावर कायदेशीर लढा देणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था बाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल, ओबीसी आरक्षण सुटत नाही तोपर्यंत निवडणुक नको ही आमची देखील भूमिका आहे, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.

'त्याच्याशिवाय जगणं मुश्किल', सर्वात प्रिय व्यक्ती दूर गेल्याने मलायका भावुक

'या आंदोलनात लोक आले नाही, यांनीच दहीहंडी बांधली यांनीच फोडली. राजकीय लाभ घेण्यासाठी जनतेचा बळी देऊ नका. एकीकडे केंद्र म्हणते गर्दी करू नका, दुसरीकडे भाजप गर्दी करण्यासाठी आवाहन करतात. ही भाजपची दुतोंडी भूमिका आहे, अशी टीकाही मलिक यांनी केली.

First published:

Tags: NCP, Sharad pawar