आजचा सूर्योदय एक नवा इतिहास रचतोय.. सुप्रिया सुळेंनी केले 'हे' tweet

आजचा सूर्योदय एक नवा इतिहास रचतोय.. सुप्रिया सुळेंनी केले 'हे' tweet

देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करु.

  • Share this:

मुंबई,28 नोव्हेंबर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज(शुक्रवार) संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते शपथ घेणार आहे. शिवाजी पार्क इथे उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधीसाठी शिवराज्यभिषेक ही थीम आहे. तर भला मोठा स्टेज उभारण्यात आला आहे. शिवाजी पार्कमध्ये 30 हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दादर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

सुप्रिया सुळेंनी केले 'हे' tweet

'आजचा सूर्योदय एक नवा इतिहास रचतोय. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करु. अभिनंदन!'

स्वगृही परतलेल्या अजित पवारांनाही मंत्रिपद

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते स्वगृही परतले आहेत. त्यांना राष्ट्रवादीकडून मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंसोबत अजित पवारही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तर विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद आणि विधानसभा अध्यक्षपद अशी दोन्ही महत्त्वाची खाती हवी आहेत. मात्र त्याबाबत महाविकास आघाडीत अद्यापही एकमत झालेलं नाही. मात्र काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

विधानसभेबाहेर बहीण-भावाची भेट..

दरम्यान, भाजप सरकार कोसळल्यानंतर आता राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आज आमदारकीची शपथ घेण्यासाठी सर्व नवनिर्वाचित आमदार विधानभवनात दाखल झाले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व आमदारांचं स्वागत केलं. त्याचवेळी अजित पवार यांनी विधानसभेत एण्ट्री केली आणि सुप्रिया सुळे यांची गळाभेट घेतली. या भेटीबाबत सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजितदादा राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी आज विधानसभेत सदस्यत्वाची शपथ घेतली. तत्पूर्वी आम्हा दोघा भावंडांची सभागृहाबाहेर भेट झाली. यावेळी त्यांना पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. ही भेट आम्हा सर्वांसाठी आनंददायी ठरली,' असे भावनिक ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2019 09:12 AM IST

ताज्या बातम्या