संजय राऊतांच्या गुगलीवर पवारांचे षटकार, दोन्ही नेत्यांमध्ये रंगणार रोखठोक ‘सामना’!

संजय राऊतांच्या गुगलीवर पवारांचे षटकार, दोन्ही नेत्यांमध्ये रंगणार रोखठोक ‘सामना’!

महाराष्ट्रात आणि देशात सध्या अनेक घटनांची चर्चा होत आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या रोखठोक प्रश्नांना शरद पवार काय उत्तरे देतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

  • Share this:

मुंबई 6 जुलै: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आत्तापर्यंत शिवसेना प्रमख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखती चांगल्याच गाजल्या आहेत. सामनामधून या मुलाखती आल्यानंतर अनेकदा देशभर वादळं निर्माण झाली होती. राऊतांच्या बेधडक प्रश्नांना बाळासाहेबांनी दिलेली बेधडक उत्तरं चांगलीच गाजली होती. आता संजय राऊतांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. राऊतांनीच ट्वीटरवरून याची माहिती दिली. लवकरच ही रंगलेली रोखठोक मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.

या मुलाखतीत राऊतांनी शरद पवारांना अनेक गुगली प्रश्न विचारले मात्र त्या सर्व प्रश्नांवर पवारांनी षटकार ठोकत खास आपल्या शैलीत उत्तरं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चीन पासून ते महाराष्ट्रातल्या घटनांपर्यंत अनेक विषयांवर पवारांना प्रश्न विचारले ही प्रश्नोत्तरे सामना स्टाईल झाली. लवकरच ही मुलाखत सामनामध्ये येणार आहे. या मुलाखतीचे व्हिडीओही प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

शरद पवारांनीही अतिशय मोकळेपणाने आपले विचार मांडले असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत आणि शरद पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. महाराष्ट्रात आणि देशात सध्या अनेक घटनांची चर्चा होत आहे. महाराष्ट्रात तीनही पक्षांमध्ये समन्वय नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेवर नाराज आहे असं म्हटलं जात आहे. तर देशपातळीवर कोरोना, चीन, आर्थिक संकट असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्या रोखठोक प्रश्नांना शरद पवार काय उत्तरे देतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: July 6, 2020, 9:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading