मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'...आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी'; रुपाली चाकणकरांचं त्या ट्विटला प्रत्युत्तर

'...आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी'; रुपाली चाकणकरांचं त्या ट्विटला प्रत्युत्तर

 'आज वसूली चालू आहे का बंद? असा सवाल करत अमृता फडणवीस यांनी  महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

'आज वसूली चालू आहे का बंद? असा सवाल करत अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

आजच्या महाराष्ट्र बंदवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Amruta Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारला खोचक सवाल केला. त्यानंतर राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर(rupali chakankar) यांनी अमृता फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 11 ऑक्टोबर : आजच्या महाराष्ट्र बंदवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Amruta Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारला खोचक सवाल केला. त्यानंतर त्यांना आता प्रत्युत्तर कोण देणार अशी चर्चा रंगली असतानाच, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर(rupali chakankar) यांनी अमृता फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

लखीमपूर हिंसाचार प्रकरणावर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदला हाक दिली आहे. सरकारच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच 'आज वसुली सुरु आहे की बंद? 'असा खोचक सवाल ट्विट करत अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला.

हे वाचा-Maharashtra Bandh : आज वसुली चालू आहे का बंद? अमृता फडणवीस यांचा खोचक सवाल

दरम्यान, त्याच्या या ट्विटचा राष्ट्रवादी नेत्या चाकणकर यांनी समाचर घेतला आहे. ‘वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो?? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी’, असे ट्वीट चाकणकर यांनी केले आहे.

अमृता फडणवीस या सक्रीय राजकारणात नसल्या तर त्या ट्वीटर किंवा अन्य माध्यमातून सातत्यानं महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना पाहायला मिळतात.

rupali chakankar

रुपाली चाकणकरांनी अमृता फडणवीसांच्या 'त्या' ट्विटचा समाचार

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. 'महाविकास आघाडी प्रायोजित बंदचा चेहरा उघडा पडला आहे. कारण लखीमपूर प्रकरणात बंद करतात. पण राज्यातल्या शेतकऱ्यांना एका पैशांची मदत केली नाही.

हे वाचा- संजय राऊतांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत दिली सर्वांत महत्त्वाची माहिती

कर्जमाफी, मदतीच्या घोषणा हवेत विरल्या आहे. त्यांच्या घटक पक्षांना म्हणाले की, भाजप सरकार बरे होते. आघाडी सरकारच्या काळात पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला, त्यांना बंद करण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवाल फडणवीस यांनी विचारला.

First published:

Tags: Amruta fadanvis, Devendra Fadnavis, Maharashtra politics, NCP