प्रफुल्ल पटेल यांना इक्बाल मिर्ची प्रकरणी ED ने बजावला समन्स, 'या' तारखेला चौकशी

प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबाने प्रमोट केलेली कंपनी आणि इक्बाल मिर्ची या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इक्बाल मेमन यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 15, 2019 05:32 PM IST

प्रफुल्ल पटेल यांना इक्बाल मिर्ची प्रकरणी ED ने बजावला समन्स, 'या' तारखेला चौकशी

मुंबई,15 ऑक्टोबर: अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इक्बाल मिर्चीसोबत आर्थिक आणि जमीन व्यवहार झाल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयने (ED)राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना समन्य बजावला आहे. प्रफुल्ल पटेल यांना येत्या 18 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, यासंदर्भात पटेल कुटुंबीयांना चौकशीसाठी बोलवण्यात येऊ शकते. ज्यांनी हजरा मेमन यांना दोन मजले दिले त्यांच्याकडे विचारणा केली जाऊ शकते. त्याशिवाय या व्यवहारात आणखी काही आर्थिक देवाण-घेवाण झाली आहे का, हे देखील विचारले जाऊ शकते. दुसरीकडे, आपण ED च्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबाने प्रमोट केलेली कंपनी आणि इक्बाल मिर्ची या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इक्बाल मेमन यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. पटेल यांच्या कुटुंबाकडून प्रमोटेट कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स प्राव्हेट लिमिडेट आणि मिर्ची कुटुंबात झालेल्या व्यवहाराचा तपास ईडी करत आहे. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे 'सीजे हाऊस'मध्ये दोन फ्लॅट आहेत. 2007 मध्ये 'सीजे हाऊस'च्या बांधकामासाठी एक करार झाला होता. त्यावर प्रफुल्ल पटेल यांची स्वाक्षरी आहे. दरम्यान, इक्बाल फरार झाला होता आणि त्याचा लंडनमध्ये 2013 मध्ये मृत्यू झाला. पटेल यांच्या कुटुंबाची मालकी असेलल्या कंपनीने मिलेनियम डेव्हलपर्सला मिर्ची कुटुंबाकडून दोन प्लॅट देण्यात आले होते. हो प्लॅट नेहरू प्लेनेटेरियमच्या समोर आहेत. याच ठिकाणी मिलेनियम डेव्हलपर्सने 15 मजली इमारत उभी केली आहे. त्याचे नाव 'सीजे हाऊस' असे ठेवण्यात आले आहे.

11 ठिकाणी छापे

ईडीने गेल्या दोन आठवड्यात मुंबई ते बंगळुरूपर्यंत 11 ठिकाणी छापे टाकले आहेत. या ठिकाणी मिळालेल्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांच्या आधारा ईडीकडून चौकशी सुरू आहे. छाप्यात कागदपत्रांसोबत डिजिटल पुरावे, ई-मेलचा देखील समावेश आहे. यासाठी ईडीने 18 लोकांचा जबाब देखील नोंदवला आहे. ईडीला मिळाला सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे संबंधी जागा पटेल यांच्या कुटुंबाची मालकी असलेल्या कंपनीच्या नावावर होण्याआधी ती जागा इक्बाल मेमनची पत्नी हजरा मेमन यांच्या नावावर होती. याच जागेच्या पुनर्निर्मितीसंदर्भात दोघांमध्ये करार झाला होता. या कराराची कागदपत्रे देखील मिळाली आहेत.

Loading...

काय आहे प्रकरण?

'सीजे हाऊस' या 15 मजली बिल्डिंगचे कंस्ट्रक्शन अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची आणि मेसर्स मिलेनियम डेव्हलपर्सने 2006-07 मध्ये केले होते. 2006-07मध्ये झालेल्या या करारानुसार सीजे हाऊसमध्ये दोन मजले मेमन कुटुंबीयांना देण्यात आली होती. 2007 मध्ये मेसर्स मिलेनियम डेव्हलपर्सने या बिल्डिंगचा तिसरा आणि चौथा मजला इक्बाल मिर्चीच्या नावे ट्रान्सफर करण्यात आला होता. त्याचे क्षेत्रफळ जवळपास 14000 स्क्वैअर फूट होता. या दोन मजल्यांची किमत 200 कोटींच्या जवळपास आहे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांची पत्नी मिलेनियम कंपनीत शेअरहोल्डर्स आहेत.

मुख्यमंत्री फडणवीसांकडून नारायण राणेंचं तोंडभरून कौतुक, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2019 05:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...