पार्थ पवार 2 तास 'सिल्व्हर ओक'वर, मात्र शरद पवारांसोबत चर्चा झालीच नाही?

पार्थ पवार 2 तास 'सिल्व्हर ओक'वर, मात्र शरद पवारांसोबत चर्चा झालीच नाही?

गुरुवारी रात्री पार्थ पवार हे सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट : पक्षाच्या भूमिकेशी विसंगत मत व्यक्त केल्यामुळे राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार (Parth Pawar) गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फटकारल्यानंतर पार्थ पवार यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र गुरुवारी रात्री पार्थ पवार हे सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.

यावेळी पार्थ यांची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत तब्बल दोन तास बैठक झाली. या बैठकीत पार्थ पवार यांनी राम मंदिर आणि सुशांत सिंह प्रकरणात विधान का केलं, याविषयी भूमिका मांडल्याची माहिती आहे. मात्र यावेळी पार्थ यांची शरद पवार यांच्याशी थेट चर्चा झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पार्थ पवार आज जाहीर करणार भूमिका?

पुण्यात गेल्यावर आज पार्थ पवार सर्व वादाविषयी आपली भूमिका जाहीर करतील. सु्प्रिया सुळे यांच्या भेटीनंतर आता पार्थ पवार कुटुंबातील इतर सदस्यांसोबतही चर्चा करणार असल्याचं समजतं. काका, आत्या अशा ज्येष्ठ मंडळींसोबत चर्चा करून पार्थ आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.

पार्थ दुखावले, नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. पार्थ यांनी केलेल्या या मागणीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

'माझ्या नातवाच्या मागणीला मी कवडीची किंमत देत नाही, तो अपरिपक्वव आहे' अशा शब्दांत शरद पवार यांनी पार्थ पवार यांची चांगलीच कानउघडणी केली होती.

Published by: Akshay Shitole
First published: August 14, 2020, 10:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading