Home /News /mumbai /

नवाब मलिकांना कारागृहात मिळणार खुर्ची आणि गादी, कोर्टाने दिली परवानगी

नवाब मलिकांना कारागृहात मिळणार खुर्ची आणि गादी, कोर्टाने दिली परवानगी

 नवाब मलिक यांना पाठीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना खुर्ची, खाट आणि गादी द्यावी अशी विनंती करण्यात आली होती.

नवाब मलिक यांना पाठीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना खुर्ची, खाट आणि गादी द्यावी अशी विनंती करण्यात आली होती.

नवाब मलिक यांना पाठीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना खुर्ची, खाट आणि गादी द्यावी अशी विनंती करण्यात आली होती.

  मुंबई, 22 मार्च : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांचा ईडीच्या कोठडीत मुक्काम आणखी वाढला आहे. कोर्टाने नवाब मलिक यांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ करण्याचा निर्णय दिला आहे. मात्र, मलिक यांना पाठीचा त्रास होत असल्यामुळे बेड, खुर्ची आणि चटई वापरण्यास मुभा देण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. त्यांना कोर्टात हजर केले असता आधी 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.  त्यानंतर झालेल्या सुनावणीत पुन्हा कोठडीत वाढ झाली होती आणि 21 मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली होती. आज कोठडी संपत आल्यामुळे पुन्हा एकदा नवाब मलिक यांना विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने मलिक यांना जामीन देण्यास नकार दिला. मलिक यांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, नवाब मलिक यांना  पाठीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना खुर्ची, खाट आणि गादी द्यावी अशी विनंती करण्यात आली होती. याबाबतचा अहवाल कोर्टात सादर करण्यात आला आहे.  कोर्टाने मलिक यांची मागणी केली असून  कारागृहात मलिक यांना बेड, खुर्ची आणि चटई वापरण्यास मुभा देण्यात आली आहे. तसंच घरचे जेवण देण्याची मागणी केली असून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो अहवाल पाहिल्यानंतर मंजुरी दिली जाईल. नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री! दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मलिक यांचे खाते इतर मंत्र्यांकडे सोपवण्याची तयारी केली आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांना फोन करून चर्चा केली आहे. राशरद पवार यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. यावेळी नवाब मलिक यांच्या मंत्रालयातील खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर मंत्र्यांकडे वर्ग करण्यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. नवाब मलिक यांच्या खात्याची जबाबदारी देण्यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला जाणार आहे. अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तर कौशल्य विकास विभागाची जबाबदारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सोपवण्यात यावी, अशी भूमिका पवारांनी घेतली आहे. याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री ठाकरे यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये नवाब मलिक उपलब्ध नसल्यानं 2 नवे मुंबई कार्याध्यक्ष दिले जाणार आहे. नरेंद्र राणे आणि राखी जाधव हे नवे अतिरिक्त कार्याध्यक्ष असणार आहे. तसंच, परभणीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Mumbai high court

  पुढील बातम्या