मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय', नवाब मलिकांचा फडणवीसांना सणसणीत टोला

'तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय', नवाब मलिकांचा फडणवीसांना सणसणीत टोला


'आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा'

'आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा'

'आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 15 मे : राज्यात कोरोनाची(Maharashtra Corona cases) तिसरी लाट येण्याची भिती वर्तवली जात आहे. पण, दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार (MVA Goverment) आणि भाजपमध्ये (BJP) आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडतच आहे.  'फडणवीसजी (Devendra Fadnvis) तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Navab Malik) यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यांनी केलेल्या टिकेला नवाब मलिक यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे.

'आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा' असा सल्लावजा टोला नवाब मलिक यांनी भाजपला लगावला.

मैत्रिणीच्या नावानं FB अकाउंट काढून मित्रानं केला कांड, महिलेला बसला मोठा धक्का

तसंच, आता तुम्हाला माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? असा टोलाही मलिक यांनी फडणवीस यांना लगावला.

काय म्हणाले होते फडणवीस ?

केंद्राची ही भूमिका पहिल्या दिवसापासून होती, हा सर्व अधिकार राज्याचा आहे, ज्यावेळी कायदा तयार झाला 102 वी घटना दुरुस्ती झाली, तेव्हा सभागृहात आणि स्टँडिंग समितीमध्ये केंद्रानं हे स्पष्ट केलं होतं, 102 घटना दुरुस्ती नंतरही राज्याचे अधिकार हे राज्यालाच राहतील आणि केंद्राचे अधिकार हे  केंद्राला राहतील. असं असताना देखील सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांमध्ये दुमत झालं, आणि दोन न्यायाधीशांनी राज्याचे अधिकार राज्याकडे राहतील असं स्पष्ट केलं, अशी भूमिका फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर मांडली.

स्कॉटलँडमध्ये 2 भारतीयांना पोलिसांनी ताब्यात घेताच लोक रस्त्यावर, 8 तासांत सुटका

तसंच, 'दोन न्यायाधीशांनी 102 व्या घटना दुरुस्तीनंतर मागास घोषित करण्याचे अधिकार राज्याने केंद्राकडे पाठवायचे आहेत असल्याचं सांगितलं, एक न्यायाधीशांनी त्यांना समर्थन दिलं, तीन विरुद्ध दोन असं मत होऊन केंद्राकडे आहे असं प्रतिपादित करण्यात आलं. यासंदर्भात केंद्रानं हे अधिकार राज्याचे आहेत यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केली, सगळं आम्ही करायचं आणि राज्यानं केवळ माशा मारायच्या आणि मिळालेलं आरक्षण घालवायचं हे किती दिवस चालायचं?'असा सवालच फडणवीस यांनी उपस्थिती केला होता.

'अशोक चव्हाण साहेबांनी कायदा समजून आणि सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका कोण करू शकत यासंदर्भात विचार करून त्या संदर्भात निर्णय केला पाहिजे,आता 50 टक्क्यावरचं आरक्षण जे स्टेट लॉने दिला होता, राज्याच्या कायद्यानं दिलं होतं, त्यामुळे याच्या विरुद्ध पुनर्विचार याचिका केंद्र सरकार अशी करेल, राज्यालाच ती करावी लागेल, सर्व समजतं, सर्व माहिती आहे, मात्र आपलं अपयश लपविण्यासाठी प्रत्येक गोष्ट केंद्राच्या माथी मारणारे ही लोकं आहे' अशी टीकाही फडणवीसांनी केली.

First published: