मुंबई, 26 नोव्हेंबर : महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष (mva government) पूर्ण होत आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (naryan rane) यांनी पुन्हा एकदा सरकार पडण्याबद्दल भाकित वर्तवलं आहे. पण, देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) हे भविष्यवाणी करून थकले आहे त्यामुळे नारायण राणे हे बोलत आहे. त्यांचे कार्यकर्ते नवसाचे कोंबडे आणून देत आहे, त्यामुळे त्यांना बोलण्याशिवाय पर्याय नाही' असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी लगावला.
मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना नवाब मलिक यांनी नारायण राणे यांच्या भविष्यवाणीवर भाष्य करत भाजपला सणसणीत टोला लगावला आहे.
'याआधी देवेंद्र फडणवीस हे भविष्यवाणी करून थकले आहे,त्यांची भविष्यवाणी ही खरी ठरली नाही. त्यांच्या नंतर ही जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे आली. ते झोपेतून उठून भविष्यवाणी करत होते, पण काहीही फरक पडला नाही. आता नारायण राणे यांनी हा मोर्चा सांभाळला आहे. राणे हे २३ वर्षांआधी मुख्यमंत्री होते, त्याकाळापासून त्यांचे कार्यकर्ते नवसाचे कोंबडे आणि बोकडे आणून देत आहे, त्यांना दाखवत आहे, त्यामुळे त्यांना बोलण्याशिवाय पर्याय नाही' असा टोला मलिक यांनी लगावला.
IPO निवडताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, होणार नाही नुकसान
'आमचं सरकार हे खंबीर आहे. ५ वर्ष पूर्ण करेल आणि आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे की, आम्ही सत्तेत पाच वर्षांसाठी आलो नाही. तर २५ वर्ष महाविकास आघाडीचे सरकार राहणार आहे. त्यामुळे जुने भाजपचे नेते आता बोलून थकले आहे. आता नवीन प्लेअरला जबाबदारी दिली आहे, त्यामुळे ते बोलत आहे पण कुणाच्या बोलण्यामुळे सरकार पडत नाही' असंही मलिक यांनी ठणकावून सांगितलं.
बाबर आझमसह पाकिस्तान संघावर गुन्हा दाखल, काय आहे कारण?
2 वर्षात सरकारने कोरोना असतांना ही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले,मदत केली. सरकारने कोरोना परिस्थिती योग्य रितीने सांभाळली. विकास कामे ही सरकारने थांबू दिली नाही. नव्या रोजगार निर्मितीचा नवा उपक्रम ही सरकारने हाती घेतला आहे. महत्वाचे निर्णय सरकारने दोन वर्षात घेतले, असंही मलिक यांनी सांगितलं.
भाजप हा खोटी भविष्यवाणी करणारा पक्ष - नाना पटोले
तर, भाजप हा खोटी भविष्यवाणी करणारा पक्ष आहे. त्यांची अनेक भविष्यवाणी खोट्या ठरल्या आहे. त्यामुळे जनता त्यांच्या भविष्यवाणी वर विश्वास ठेवत नाही. महाविकास आघाडी मजबूत आहे सरकारला कोणताही धोका नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nawab malik, नवाब मलिक