भाजपला धक्का देण्यासाठी काय आहे राष्ट्रवादीचा प्लॅन? चर्चेनंतर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

भाजपला धक्का देण्यासाठी काय आहे राष्ट्रवादीचा प्लॅन? चर्चेनंतर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी गौप्यस्फोट केला आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात घेत राष्ट्रवादीकडून राज्यात 'मिशन घरवापसी' राबवण्यात येणार असल्याच्या चर्चेने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. गयारामांना पुन्हा पक्षात घेण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे सोपवल्याचंही बोललं जात आहे. या सगळ्यावर आता राष्ट्रवादीकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

'भाजपमध्ये जे आमदार गेले त्यांना तिथं किंमत नाही. त्यामुळे ते पुन्हा एनसीपी पक्षात येऊ पाहत आहेत. हे आमदार शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत संपर्कात आहेत. असे आमदार स्थानिक राजकारणाचा विचार करून पक्ष प्रवेश करत आहेत,' असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

दरम्यान, यावेळी नवाब मलिक यांनी पार्थ पवार यांच्याबाबतही भाष्य केलं आहे. 'पार्थ तरूण नेते आहेत. त्यांचा अनुभव कमी. पार्थ वक्तव्य गांभीर्य घेण्यासारखे नाही. तरुणांकडून चूका होतात त्यात सुधारणा करता येतात,' असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

राज्याच्या राजकारणात होणार भूकंप?

शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात काल (बुधवारी) एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत नेत्यांच्या घरवापसीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तीनही पक्षाचं राजकारण, पक्षाची ताकद पाहून गयारामांना पुन्हा प्रवेश दिला जाणार असल्याचं कळतंय.

काय म्हणाले होते छगन भुजबळ?

'आमच्या संपर्कात भाजपचे काही आमदार असतील तर आम्ही काही असं जाहीररित्या सांगणार तर नाही ना! जर भाजपचे कोणी आमदार आमच्याकडे आले तर त्यांना राजीनामा देऊन त्यांना यावं लागेल, ते आमच्याकडे आले तर ते निवडून येऊ शकतात,' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 13, 2020, 2:29 PM IST

ताज्या बातम्या