• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • नवाब मलिकांची आरोपांची मालिका सुरुच, पुन्हा वानखेडेंना घेरलं; सोमय्यांना दिलं चॅलेन्ज

नवाब मलिकांची आरोपांची मालिका सुरुच, पुन्हा वानखेडेंना घेरलं; सोमय्यांना दिलं चॅलेन्ज

राष्ट्रवादीचे (ncb) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

 • Share this:
  मुंबई, 31 ऑक्टोबर: राष्ट्रवादीचे (ncb) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. काल नवाब मलिक यांनी आता आणखी एक फोटो ट्वीट केला असून ही व्यक्ती कोण आहे? असा सवाल करत समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या कुटुंबावर पुन्हा एकदा सवाल उपस्थित केला. आज पुन्हा त्याच मुद्द्यांवर नवाब मलिकांनी वानखेडे कुटुंबाला घेरलं आहे. नवाब मलिक म्हणाले की, समीर वानखेडे यांच्या मेहुण्याचा मी काल फोटो ट्विट केला आहे. सध्या तो व्हेनिसला राहतो. तो मुस्लिम आहे. त्याचा फोटो ट्विट करण्याचं कारण असं होतं की, काल राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची वानखेडे यांनी भेट घेतली. मी माझ्या मतावर ठाम आहे की समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम आहे. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण मुस्लिम होते. हेही वाचा- IND vs NZ: न्यूझीलंडच्या मॅचपूर्वी टीम इंडियाची पार्टी, शार्दुल-इशाननं केला धमाल डान्स; VIDEO  तसंच मलिकांनी पुढे आरोप केला आहे की, समीर वानखेडे यांनी बोगस दाखल्यावर ही नोकरी घेण्यात आली. 2015 पासून यांनी आपली आयडेंटिटी लपवली. म्हणजे दाऊद वानखेडे यांनी डी के वानखेडे नावं लिहिलं. आता ज्ञानदेव वानखेडे लिहायला सुरुवात केली. वानखेडे यांनी त्यांची सून आणि जावई जर आपल्या सोबत राहिले तर आपली आयडेंटिटी ओपन होईल यासाठी दोघांना घटस्फोट दिला. नवाब मलिक यांनी काल संध्याकाळी एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये एका व्यक्तीचा फोटो आहे. ही व्यक्ती कोण आहे असा सवाल मलिक यांनी उपस्थितीत केला. हा फोटो अब्दुल अझीझचा असल्याची माहिती समोर आली आहे. अब्दुल अझीझ याचं नाव हे समीर वानखेडे यांच्या पहिल्या निकाह नाम्यात आहे. तसंच, अब्दुल अझीझ आणि यास्मिन वानखेडे यांचं लग्न झालं होतं. पण त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला होता. या दोघांना एक १० वर्षांचा मुलगा असल्याची माहिती सध्या तो इटलीमध्ये आहे, असं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे. नीरज गुंडे मागच्या सरकारचा दलाल- नवाब मलिक नीरज गुंडे हा मागच्या सरकारचा दलाल आहे. हा दलाल माझ्यावर आरोप करतोय ज्याच्या घरी माजी मुख्यमंत्री जाऊन बसायचे. ज्याला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये थेट जायला मिळायचं. सगळ्या विभागाच्या सेक्रेटरीच्या ऑफिस मध्ये जात होता. वर्षावर फिरत होता. जो रश्मी शुक्लाच्या प्रकरणात गोंधळ घालत होता. महापालिकेत वारंवार जात होता. हाच दलाल आता समीर वानखेडे याच्या कार्यालयात जाऊन तासनतास बसत असतो. समीर वानखेडे सोबत ही नीरज गुंडेचे संबंध आहेत, असं नवाब मलिकांनी दावा केला आहे. हेही वाचा- Shocking! छातीत आरपार गेल्या 2 लोखंडी सळ्या,  5 तास ऑपरेशननंतर घडलं अनपेक्षित सर्व शासकीय कार्यालयात याचा मुक्त वावर असतो. हा तिथे जाऊन बसण्यामागचं देखील एक कारण आहे. कारण काशिफ खान, मोहित कंबोज, कॉर्डियला क्रूझ याचा एकमेकांशी संबंध आहे. ही बाब मी समोर आणणार त्यानंतर भाजपच्या लोकांना तोंड दाखवायची देखील लायकी राहणार नाही, असं नवाब मलिकांनी म्हटलं आहे. नीरज गुंडे किती मोठा चोर आहे तो कुणाचे पैसे कुठे लपवतो हे मला माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मी माध्यमांमध्ये विविध विषयांवर बोलत होतो म्हणून मला कशाप्रकारे त्रास देता येईल याचा प्रयत्न केला. माझ्या मुलाने जी जागा कुर्ल्यात खरेदी केली होती, त्यावेळी जाणीवपूर्वक त्यावर आरक्षण टाकलं. आम्हाला ती डेव्हलप करता येत नाही,असं मलिकांनी म्हटलं आहे. हेही वाचा- T20 World Cup मधून मोठी बातमी, धोनीपेक्षा यशस्वी कॅप्टननं केली निवृत्ती जाहीर त्यांना एवढंचं सांगणं आहे की किती आरोप तुम्हाला करायचे असेल तर करा आम्ही कुणाचे पैसे घेतलेले नाहीत. उलट त्या कंपनी मध्ये मोहिज कंबोज याचा मनूभाई आगीचा नावाचा एक नातेवाईक या प्रकरणात होता. त्याने मोहित कंबोज जे आरोप करतो आहे त्याने ते साडे तेरा कोटी रुपये घेतले आहेत. मोहित कंबोज चोर त्याचा नातेवाईक देखील चोर आणि खापर माझ्यावर फोडण्याचा प्रयत्न करत आहे, असा हल्लाबोल नवाब मलिकांनी केला आहे. किरीट सोमय्यांवरही साधला निशाणा किरीट सोमय्या दिवाळी नंतर भांडाफोड करणार आहेत. मात्र मी त्यांना सांगतो मी हा भांडाफोड करणार आहे. भाजपवाले त्यानंतर तोंड दाखवू शकणार नाहीत. पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही, असं थेट आव्हान नवाब मलिकांनी किरीट सोमय्यांना दिलं आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: