मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

समीर वानखेडेंवर आरोप प्रकरणी मलिक यांनी कोर्टात मागितली माफी, म्हणाले...

समीर वानखेडेंवर आरोप प्रकरणी मलिक यांनी कोर्टात मागितली माफी, म्हणाले...

 नवाब मलिक आमची वानखेडे परिवाराची बदनामी करत आहेत असा आरोप वानखेडे परीवाराने मुंबई उच्च न्यायालयात केला होता

नवाब मलिक आमची वानखेडे परिवाराची बदनामी करत आहेत असा आरोप वानखेडे परीवाराने मुंबई उच्च न्यायालयात केला होता

या चार पानाच्या प्रतिज्ञापत्रात नवाब मलिक यांनी मुंबई हायकोर्टात बिनशर्त माफी मागितली आहे.

मुंबई, 10 डिसेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी एनसीबीचे (ncb) मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर एकापाठोपाठ आरोप करून धुरळा उडवून दिला होता. पण, आता हायकोर्टामध्ये (mumbai high court) नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर केलेल्या काही आरोपांमुळे दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे. तसंच, यापुढे कोणतेही विधान करणार नाही, अशी हमीही दिली.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि कुटुंबांवर वेगवेगळे आरोप केले होते. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांनी आर्यन खानला केलेली अटक ही बनावट असल्याचं सांगत अनेक पुरावे सादर केले होते. एवढंच नाहीतर समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावाच करत त्यांनी अनेक फोटो आणि कागदपत्र ट्वीट केले होते. त्यामुळे वानखेडे कुटुंबीयांनी बचावासाठी कोर्टात धाव घेतली होती.

बिग बींच्या Duplex Flat मध्ये राहणार 'ही' अभिनेत्री, देणार इतकं लाख भाडं

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. मलिक यांच्याविरोधात १ कोटी २५ लाखांचा अब्रूनुकसानीचा दावा केला आहे. तसंच, मलिक यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करण्यास मनाई करावी अशी मागणीही त्यांनी केली होती. आज या प्रकरणी मलिक यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

या चार पानाच्या प्रतिज्ञापत्रात नवाब मलिक यांनी मुंबई हायकोर्टात बिनशर्त माफी मागितली आहे. वानखेडे यांच्या कुटुंबावर मी कोणतेही व्यक्तिगत आरोप केले नाही. त्यांच्याकडे दे पद आहे, त्याचा दुरुपयोग केला म्हणून मी आरोप केले होते. यापुढे कोणतीही विधाने करणार नाही, अशी हमीच मलिक यांनी कोर्टात दिली.

बीस साल बाद! ऑस्ट्रेलियाच्या मानगुटीवर इडन गार्डनचं भूत, द्रविड-लक्ष्मणनंतर आता

काही दिवसांपूर्वी न्यायालयात सुनावणी दरम्यान मलिक यांनी कोणतेही विधान करणार नाही, असं सांगितलं होतं. पण, त्यानंतर त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून पुन्हा एकदा टीका केली होती. त्यामुळे न्यायालयाने मलिक यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते.

First published: