• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Video: राज्यातल्या मंत्र्यानं केला CSMT ते उल्हासनगर लोकल प्रवास, आठवणींना दिला उजाळा

Video: राज्यातल्या मंत्र्यानं केला CSMT ते उल्हासनगर लोकल प्रवास, आठवणींना दिला उजाळा

आता राज्यातल्या एका मंत्र्यानंही लोकलनं प्रवास केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 14 नोव्हेंबर: मुंबईत कोरोनाचा (Mumbai Corona Virus) प्रार्दुभाव कमी होताना दिसत आहेत.त्यात मुंबईची लाईफलाईन लोकल (Mumbai Local Train) सध्या सर्वसामान्यांसाठी सुरु झाली आहे. ज्याचे कोरोना लसीकरण (Corona Vaccination) पूर्ण झालं आहे अशांना लोकलनं प्रवास करण्याची परवानगी आहे. बऱ्याच महिन्यांनंतर लोकल सुरु झाल्यानं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. त्यातच आता राज्यातल्या एका मंत्र्यानंही लोकलनं प्रवास केला आहे. शनिवारी संध्याकाळी जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सीएसएमटी ते उल्हासनगर असा लोकलनं प्रवास केला आहे. आज पक्षाच्या कामकाजासाठी उल्हासनगरला जात असताना जयंत पाटील यांनी बऱ्याच दिवसांनी आपल्या सहकाऱ्यांसह लोकल ट्रेननं प्रवास केला आहे. या प्रवासादरम्यान जयंत पाटील यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. विद्यार्थी दशेत असताना जयंत पाटील यांनी लोकलनं प्रवास केला आहे. त्यानंतरही काही काळ लोकलनं प्रवास केल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. सहकाऱ्यांसोबत लोकलनं प्रवास करत असताना गप्पा मारताना जयंत पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: