भाजप प्रवेशासाठी प्रयत्न केल्याचा आरोप, जयंत पाटलांनी नारायण राणेंवर केला जोरदार पलटवार

जयंत पाटील हे आपल्या उपरोधिक टोल्यांसाठी ओळखले जातात. चिमटे काढत विरोधकांचा समाचार घेण्यात ते कोणतीही कसर ठेवत नाहीत.

जयंत पाटील हे आपल्या उपरोधिक टोल्यांसाठी ओळखले जातात. चिमटे काढत विरोधकांचा समाचार घेण्यात ते कोणतीही कसर ठेवत नाहीत.

  • Share this:
मुंबई, 30 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रवेशासाठी प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपावर उत्तर देताना जयंत पाटील यांनी भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. 'दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे. आलेली सत्ता जाते व ती पुन्हा मिळवता येते ही पवार साहेबांची शिकवण आहे. त्यामुळे सत्ता हा विषय माझ्यासाठी गौण आहे,' असं प्रत्युत्तर ट्विटरद्वारे जयंत पाटील यांनी दिलं आहे. जयंत पाटील हे आपल्या उपरोधिक टोल्यांसाठी ओळखले जातात. चिमटे काढत विरोधकांचा समाचार घेण्यात ते कोणतीही कसर ठेवत नाहीत. आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या याच शैलीत भाजपला फटकारलं आहे. 'माझ्या पुरते सांगायचे झाले तर माझी भाजपच्या कोणत्याही वरीष्ठ नेत्याशी भाजपमध्ये जाण्याबाबत चर्चा झाली नाही म्हणून हा खुलासा. मी शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असल्याने असा विचार माझ्या मनात कधीच शिवत नाही. त्यामुळे मागील 5 वर्षे सरकारच्या विरोधात विधीमंडळात लढत होतो,' असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांना टोला 'राणे साहेबांची भाजपच्या वरीष्ठ नेत्यात गणती होत नाही हे जाणून खेद झाला. भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी माझी कधी, कुठे चर्चा झाली याचा तपशील मला कळला तर माझ्या ज्ञानात भर पडेल,' असं म्हणत जयंत पाटील यांनी राणेंना टोला लगावला.
Published by:Akshay Shitole
First published: