Home /News /mumbai /

PM मोदींच्या भाषणावर महाराष्ट्रातून पहिली प्रतिक्रिया, जयंत पाटलांनी केली टीका

PM मोदींच्या भाषणावर महाराष्ट्रातून पहिली प्रतिक्रिया, जयंत पाटलांनी केली टीका

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई, 20 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायंकाळी 6 वाजता देशाला संबोधित करत कोरोनाबाबत अधिक काळजी घेण्याचं आवाहन केलं. मात्र या आवाहनाशिवाय पंतप्रधान मोदी यांनी इतर कोणतीही नवी घोषणा केली नाही. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधून केलेल्या भाषणातून महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला,' अशा शब्दात ट्विटरवरुन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील...कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील...अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही,' असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदी भाषणात नेमकं काय म्हणाले? 'व्हायरस वाढू नये यासाठी खबरदारी घ्यावी लागेल. बेफिकीर होण्याची ही वेळ नाही. कोरोना गेला असं समूज नका. कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. काही देशांमध्ये Covid-19 ची प्रकरणं कमी झालेली दिसली आणि नंतर पुन्हा वाढली, अशी उदाहरणं आहेत. त्यामुळे ही वेळ निष्काळजीपणाची नाही. बेजबादार लोक स्वतःबरोबर कुटुंबालाही धोक्यात टाकतात', असं नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले. त्यामुळे दो गज की दूरी, मास्क आणि सतत साबणाने हात धुणे बंद करू नका. यापासूनच Coronavirus ला दूर ठेवता येईल, अशी आठवण पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना करून दिली.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Jayant patil, PM narendra modi

पुढील बातम्या