Home /News /mumbai /

पहिला विचार गोरगरीबांचा, राष्ट्रवादीने केले मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचं कौतुक

पहिला विचार गोरगरीबांचा, राष्ट्रवादीने केले मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचं कौतुक

राज्याला व जनतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडी शासनाच्यावतीने सर्व प्रयत्न केले जात आहे.

    मुंबई, 14 एप्रिल : अनेक बैठका, व्यापाऱ्यांचा विरोध,  विरोधी पक्षाकडून आक्षेप आणि राज्यातील कोरोनाच्या (Corona) वाढत्या परिस्थितीमुळे अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackey) यांनी राज्यात लॉकडाऊनची (Maharashtra Lockdown) घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant patil) यांनी 'संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री संदेशाने सरकार चालतेय याचा प्रत्यय आज मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून आला' असं म्हणत कौतुक केले आहे. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री संदेशाने हे सरकार चालवू असा संकल्प आम्ही केला होता. आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संबोधनातून त्याची प्रचिती आली आहे,  असं मत जयंत पाटील यांनी ट्वीट करून मांडले आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी निर्बंध घालताना शासनाने पहिला विचार गोरगरीबांचा केल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. जनता कर्फ्यूची घोषणा होताच मुंबईकरांनी मनपा आयुक्तांना विचारला 'हा' प्रश्न राज्याला व जनतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडी शासनाच्यावतीने सर्व प्रयत्न केले जात आहे. प्रशासन अहोरात्र काम करत असून आज आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे, असं आवाहनही जयंत पाटील यांनी जनतेला केलं आहे. दरम्यान, राज्यात मार्च 2021 पासून कोविड-19 ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडट टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. पण या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि आर्थिक सहाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या पाठिशी उभे आहे. याकाळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मोफत धान्य देण्याची घोषणा करत राज्य सरकारने प्रती कुटुंब 105 रुपयांचाच भार सोसला आर्थिक दुर्बल घटकांमधील दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, महिला, वयोवृध्द नागरीक, विधवा, दिव्यांग, असंघटित क्षेत्रातील नागरिक, कामगार, रिक्षाचालक व आदिवासी समाज यांना विचारात घेवून आर्थिक सहाय देण्यात येणार आहे. यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, उद्योग-ऊर्जा व कामगार विभाग, नगर विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्थसहाय देण्यात येणार आहे. एक महिना मोफत अन्नधान्य अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य  देण्यात येईल. राज्यात शिवभोजन योजनेतून गरजूंना एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येतील. सुमारे दोन लाख थाळ्या देण्याचे नियोजन आहे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या