मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /किरीट सोमय्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर मुश्रीफांचं जशास तसे उत्तर, म्हणाले...

किरीट सोमय्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर मुश्रीफांचं जशास तसे उत्तर, म्हणाले...

 '1500 कोटींच्या घोटाळ्याचा कुठून जावई शोध लावला? माझ्या जावयाचा संबंध नाही, विना पुरावा ते कसं बोलतात.

'1500 कोटींच्या घोटाळ्याचा कुठून जावई शोध लावला? माझ्या जावयाचा संबंध नाही, विना पुरावा ते कसं बोलतात.

'1500 कोटींच्या घोटाळ्याचा कुठून जावई शोध लावला? माझ्या जावयाचा संबंध नाही, विना पुरावा ते कसं बोलतात.

मुंबई, 28 सप्टेंबर : भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी कोल्हापुरात (kolhapur) जाऊन अखेर राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. पण, 1500 कोटींच्या घोटाळ्याचा कुठून जावई शोध लावला? माझ्या जावयाचा यात काही संबंध नाही, विनापुरावे ते बोलत आहे' असा पलटवार हसन मुश्रीफ यांनी सोमय्यांवर केला.

किरीट सोमय्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन जशास तसे उत्तर दिले आहे.

'किरीट सोमय्या यांनी घोरपडे कारखान्याविरोधात तक्रार दिली आहे, त्याची चौकशी काय होईल ते होईल. आज कोल्हापूर सत्र न्यायालयात 100 कोटींचा दावा दाखल केला आहे आणि अशी वक्तव्य त्यांनी करू नये यासाठी बंदी घालण्याची याचिका केली होती, पण त्यांनी नोटीस घ्यायला नकार दिला, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.

उरीमध्ये मोहीम फत्ते! 18 वर्षांच्या दहशतवाद्याला जिवंत पकडलं, दुसऱ्याचा खात्मा

तसंच, 'किरीट सोमय्या माझ्या जावई आणि कुटुंबीयांची नावं उगाच घेत आहेत. माझ्या जावयाचा यात काहीही संबंध नाही. आयुष्यभर आपण नाव कमावतो आणि एका दिवसात कुणीही येऊन खराब करण्याचा प्रयत्न करतात, पण मी हे होऊ देणार नाही, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला.

अनोळखी पुरुषासोबत बोलल्याने तालिबानी शिक्षा; विवाहितेला झाडाला बांधलं अन्...

'1500 कोटींच्या घोटाळ्याचा कुठून जावई शोध लावला? माझ्या जावयाचा संबंध नाही, विना पुरावा ते कसं बोलतात. आता यापुढे मी काही बोलणार नाही, काही त्यांनी बोलु दे. मी पूर्णपण निर्दोष आहे. हा माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. मी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे, विनाकारण प्रसिद्धी मिळतेय. सातत्याने खोटं बोललं जातंय. मी भाजपच्या विरुद्ध बोलतो म्हणून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, असंही मुश्रीफ म्हणाले.

किरीट सोमय्यांनी पोलिसांत दिली तक्रार

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर  गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहे. तीन दिवसांपूर्वी कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यात आले होते. त्यानंतर आज सोमय्या अखेर कोल्हापूरला दाखल झाले. त्यांनी कागल येथील कारखान्यांची पाहणी केली. त्यानंतर मुरगूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्याविरोधात आयपीसी 120 ब, 420, 467, 468, 471 अशा वेगवेगळ्या कलमाखाली हसन मुश्रीफ आणि त्यांच्या परिवाराच्या विरोधात ही तक्रार केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जंग जंग पछाडले. तरी मी पोलीस ठाण्यात पोचलो.  माफियागिरीसारखा पोलिसांचा वापर केला. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील च्या आदेशानुसार मला कोंडून ठेवलं कोणत्या अधिकारात त्यांनी हे केलं यासाठी राज्यपालांकडे तक्रार करणार आहे,  मानव अधिकार कार्यालयात तक्रार करणार आहे, असं यावेळी सोमय्या म्हणाले.

'मला खात्री आहे, ठाकरे सरकार या पोलीस स्टेशनकडून तक्रार दाखल करून घेणार नाही. सात दिवसात एफआयआर दाखल नाही केलं तर न्यायालयात जाणार आहे, असा इशाराही सोमय्यांनी दिला.

First published:
top videos