• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नवी मुंबईतील राजकारणात नवा ट्विस्ट, नाईकांच्या भाजप प्रवेशाबद्दल सस्पेन्स
  • VIDEO : नवी मुंबईतील राजकारणात नवा ट्विस्ट, नाईकांच्या भाजप प्रवेशाबद्दल सस्पेन्स

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 11:21 AM IST | Updated On: Jul 30, 2019 12:26 PM IST

    नवी मुंबई, 30 जुलै : एकामागून एक राष्ट्रवादीला गळती लागल्यानंतर आता राष्ट्रवादीचे बडे नेते गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला अशी चर्चा आहे. उद्या सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी गणेश नाईक भाजपत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षावर हा प्रवेश होईल. दरम्यान, याआधी गणेश नाईकांचं आज नवी मुंबईत मोठं शक्तिप्रदर्शन असणार आहे. मात्र, माजी मंत्री गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशाने भाजप आमदार मंदा म्हात्रे नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्री रविंद्र चव्हाण मंदा म्हात्रेची भेट घेणार आहेत. म्हात्रेंची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चव्हाणांना सांगितल्याचं असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी