Home /News /mumbai /

अखेर एकनाथ खडसे ईडी कार्यालयात पोहोचले, मुलीचीही होणार चौकशी

अखेर एकनाथ खडसे ईडी कार्यालयात पोहोचले, मुलीचीही होणार चौकशी

आज सकाळी एकनाथ खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी शारदा खडसे या देखील ईडी कार्यालयात दाखल झाल्या

    मुंबई, 15 जानेवारी : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे  (Eknath Khadse) अखेर चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने (ED) च्या कार्यालयात हजर झाले आहे. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी शारदा खडसे या सुद्धा सोबत आहे. आज सकाळी एकनाथ खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी शारदा खडसे या देखील ईडी कार्यालयात दाखल झाल्या.  भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहार हा शारदा खडसे यांच्या नावावर आहे. त्यामुळे शारदा खडसे यांची सुद्धा चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.  एकनाथ खडसे यांच्यावर पदाचा दूरउपयोग करून व्यवहार केल्याचा आरोप आहे. तर आर्थिक व्यवहाराबद्दल शारदा खडसे यांच्यावर आरोप आहे. संजय राऊत यांनी घेतली सहकुटुंब शरद पवारांची भेट मध्यंतरी, भाजपला रामराम ठोकून एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली होती. ३० डिसेंबरला एकनाथ खडसे यांना चौकशीला हजर राहायचे होते. ते ईडी कार्यालयात हजर होण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. तारीख ठरली! या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी परंतु, कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी वकिलामार्फत कोर्टात दिली. त्यामुळे ते ED च्या चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही, असंही सांगण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आला होता. गेली 14 दिवस मुंबईत उपचार घेतल्यानंतर अखेर एकनाथ खडसे हे ईडीच्या चौकशीला सामोरं गेले आहे.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या