Home /News /mumbai /

मोठी बातमी! अखेर एकनाथ खडसेंनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी

मोठी बातमी! अखेर एकनाथ खडसेंनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी

राष्ट्रवादीत गेल्यानंतरही फडणवीस यांच्यावरचा खडसे यांचा राग शांत झालेला नाही. संधी मिळताच ते फडणवीसांवर निशाणा साधत असतात.

    मुंबई 9 नोव्हेंबर: भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) एका वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका करताना मी मुख्यमंत्रीपद एका ब्राह्मणाला दान दिलं असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळे खडसे यांच्यावर टीक होत होती. ब्राह्मण महासंघानेही त्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. त्यानंतर वाद चिघळू नये म्हणून खडसे यांनी माफी मागितली आहे. माझ्य वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचंही ते म्हणाले. खडसे म्हणाले, 6 नोव्हेंबरला मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. राष्ट्रवादीत गेल्यानंतरही फडणवीस यांच्यावरचा खडसे यांचा राग शांत झालेला नाही. संधी मिळताच ते फडणवीसांवर निशाणा साधत असतात. काय म्हणाले होते खडसे? 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी  मुख्यमंत्रिपदावरून  भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होते. पण 'हा नाथाभाऊ दिलदार आहे. त्यावेळी नाथाभाऊ तुम्ही घरी बसा, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, असं सांगण्यात आलं होतं. मी भल्याभल्यांना दान देतो. मग एका ब्राह्मणाला दान देण्यात हरकत काय आहे', असं वक्तव्य खडसे यांनी केलं होतं. तसंच, 'एका व्यक्तीच्या लाडापोटी  माझ्यासारख्या नेत्याला बाजूला टाकण्यात आले. आज त्याच व्यक्तीमुळे भाजप सरकारचे वाटोळं झालं आहे, अशा लोकांमुळे मला भाजप पक्ष सोडावा लागला, असंही खडसे म्हणाले. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये निवड न झाल्यामुळे एकनाथ खडसे कमालीचे नाराज झाले होते. त्यामुळे अखेर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. भाजप सोडण्यासाठी खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांनाच जबाबदार धरले आहे. 'भाजप पक्ष सोडण्याचे एकमेव कारण म्हणजे, देवेंद्र फडणवीस हेच आहे. त्यांच्यामुळे आपण पक्ष सोडत आहोत. ते जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. त्यावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून  गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते, असा आरोप खडसेंनी पक्ष सोडताना केला होता.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Eknath khadse

    पुढील बातम्या